नवी दिल्ली : दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या गाजीपूर बॉर्डरवर तणावाची परिस्थिती कायम असून आता उत्तर प्रदेश सरकाने आंदोलनाची जागा करणाऱ्या शेतकऱ्यांना जागा खाली करण्याचे आदेश दिले. याच ठिकाणी गेल्या 60 दिवसापासून आंदोलन सुरू आहे.
दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीनर गाजीपूर बॉर्डरवर पोलिसांची तुकडी तैनात करण्यात आली आहे. आदेशानंतर भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत म्हणाले, आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. गाजियाबाद प्रशासनाशी बातचीत करणार नाही नसून या संदर्भात फक्त केंद्र सरकारशीचं चर्चा होईल.
गाजियाबाद सरकारने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना मध्यरात्रीपर्यंत यूपी गेट खाली करण्याचे आदेश दिले आहे. गाजियाबादचे जिल्हाधिकारी अजय शंतर पांडे म्हणाले, दिल्लीतील यूपी गेटवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी बातचीत केली असून रात्रीपर्यंत आंदोलनाची जागा खाली करण्यास सांगितले आहे. जर शेतकरी आंदोलकांनी जागा खाली नाही केली तर प्रशासनाला कडक पावले उचलावी लागतील.
राकेश टिकैत म्हणाले, आम्ही आंदोलन मागे घेणार नाही. गोळी चालवली तरी आम्ही जागा खाली करणार नाही. गोळी चालवली तरी आम्ही मागे हटणार नाही. आमचे आंदोलन सुरूच ठेवणार आहे. कोणालाही अटक नाही होणार जर अटकेचा प्रयत्न केला तर मी इथेच फाशी घेईल.
शेतकरी नेत्यांविरोधात गुन्हे दाखल
ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचाराबद्दल बर्याच दिल्ली पोलिसांनी अनेक शेतकरी नेत्यांविरूद्ध गुन्हे दाखल केले आहेत. दिल्ली पोलिसांच्या एफआयआरमध्ये योगेंद्र यादव यांच्या नावाचाही समावेश आहे. त्यांच्याशिवाय राकेश टिकैत, सरवनसिंग पंढेर आणि सतनामसिंग पन्नू यांचीही नावं एफआयआरमध्ये नाव आहे. या नेत्यांव्यतिरिक्त पंजाबी अभिनेता आणि गायक दीप सिद्धू आणि लखबीरसिंग उर्फ लखा सिधाना हे देखील दिल्ली पोलिसांच्या रडारवर आहेत. पोलिसांनी आतापर्यंत 37 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. शेतकरी नेत्यांविरोधात विविध कलमांर्तगत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत 93 जणांना अटक केल्याचं बोललं जात आहे. तर 200 लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या हिंसाचाराबद्दल दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये असा आरोप केला जात आहे की पोलिसांनी ट्रॅक्टर रॅलीसाठी जारी केलेल्या एनओसीचे पालन केले गेले नाही.
Farmers Protest | सिंघू बॉर्डवर पुन्हा गोंधळाचं वातावरण; आंदोलक शेतकऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी