मुंबई :  दोन वेळेचा ऑलिम्पिपदक विजेता सुशीलकुमारला दिल्ली पोलिसांनी हत्येच्या आरोपखाली अटक केली आहे. मात्र त्याच्या अटकेनंतर आता काही प्रश्न उद्भवू लागले आहेत.  सुशील कुमारचे गॅंगस्टरसोबत काही कनेक्शन होता का? तो स्वतः गॅंगस्टर होण्याच्या मार्गावर होते का? हे सगळे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. 


भारतीय कुस्तीपटू सुशील कुमारला दिल्ली पोलिसांनी सागर धाखडच्या हत्येच्या आरोपाखाली अटक केली. सागर सुशील कुमारकडे भाड्याने राहत होता. सागरने  काही महिन्यांच भाडं थकवलं होतं म्हणून या रागातून ही हत्या झाल्याचं सांगितल जात होतं. पण तपासात आता इतर धक्कादायक कारण समोर येऊ लागली आहेत. इतकंच नाही तर सुशील कुमार गॅंगस्टरच्या संपर्कात होता आणि तो ही गॅंगस्टर बनण्याच्या वाटेवर होता का? असा सवाल निर्माण होऊ लागला आहे. सुशील कुमार फक्त दिल्ली पोलिसांपासून वाचत नव्हता तर तो संदीप उर्फ काला जठेडी पासून पण स्वत:ला वाचवत होता कारण जठेडीच्या हिटलिस्टवर सुशील कुमार  होता.   दोन गँगस्टरबरोबर व्यवसाय केल्यानं सुशील कुमारही गँगस्टर होण्याकडे वाटचाल करत होता असा संशय आहे. 


दिल्ली स्पेशल सेलने दिलेल्या माहितीनुसार त्या रात्री सुशील कुमारचा टार्गेट सागर धाखड नाही तर काला जठेडीचा भाचा सोनू होता. जठेडीसाठी सोनू मुलासारखा आहे. सोनूच जठेडीची गॅंग दिल्लीमध्ये चालवायचा. सुशील कुमारही सोनू सोबतच दिल्ली मध्ये प्रॉपर्टीचा व्यवसाय करायचा ज्यामध्ये जठेडी आणि सुशील पार्टनर होते. सुशील आणि जठेडी मिळून दिल्लीमध्ये व्यवसाय करत होते. सुशीलकुमार आणि सोनूमध्ये पैशावरुन वाद झाला आणि सुशीलने त्या रात्री सोनूवर हल्ला केला. ज्यामुळे जठेडी आता सुशीलला संपवण्यासाठी योजना आखत असल्याची भीती देखील  दिल्ली पोलिसांसमोर वर्तवली आहे.


 कोण आहे काला जठेडी? 


जठेडी हा उत्तर भारतातील एक कुख्यात गुंड आहे. जो दुबईमधून उत्तर भारतात दहशत माजवण्यामध्ये सक्रिय आहे. ज्या दिवशी सागर धाखडची हत्या झाली त्या दिवशी सुशील कुमारने ज्या गुंड सोनूला मारहाण केली त्याच्यावर 19 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असून तो काला जठेडीचा पुतण्या आहे. 
 
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुशील कुमारने सुरुवातीला काला जठेडी  आणि लॉरेन्स बिष्णोई बरोबर मैत्री केली आणि त्याच्या अनधिकृत कामांमध्ये त्याचा भागीदार झाला. उत्तर प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड येथे टोल बूथचे कॉन्ट्रॅक्ट मिळवण्याचे प्रयत्न करु लागला.  तर दिल्ली मधील विवादित प्रॉपर्टीवर सुद्धा जठेडी आणि सुशील कुमार डोळे ठेवून होता. इतकंच नाही तर दिल्लीत  M2 ब्लॉकमध्ये  एक घर सुद्धा घेतलं होते. या घरातून गुन्हेगारीचे कट रचले जात होते तसेच गुन्हा केल्यानंतर या घराचा वापर लपण्यासाठी सुद्धा केला जात होता. 


 काला जठेडी आणि सुशीलकुमार यांच  प्रॉपर्टीला घेऊन काही वाद झाले आणि सुशीलकुमार ने जठेडीचे  विरोधक निरज बवाना आणि नवीन बाली सोबत हात मिळवणि केली. ज्या मुळे कुमार आणि जठेडी मधला दुरावा वाढत गेला. मात्र सुशीलकुमारच्या मनात भीती ही निर्माण होऊ लागली ज्यामुळे तो पोलिसांपासून कमी आणि जठेडी पासून जास्त वाचण्याचा प्रयत्न करत होता. 


काला जठेडी पासून वाचण्यासाठी सुशीलकुमारने 18 दिवसात पाच राज्यात लपण्याचा प्रयत्न केला. तर सुशील कुमार पोलिसांच्या पुढे सरेंडर ही करणार होता मात्र त्याआधीच पोलिसांनी त्याला पकडल्याचे सांगितलं जात आहे. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नाव लौकिक करणारा कुस्तीपटू कसा गॅंगस्टर बनण्याच्या मार्गावर कसा वळला हे येणाऱ्या काही दिवसाच्या तपासात स्पष्ट होईल. 


संबंधित बातम्या :


Chhatrasal Stadium Murder Case | ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारविरोधात लूक आऊट नोटीस