मुंबई : उत्तराखंडमधील बोगद्याच्या दुर्दैवी दुर्घटनेसोबत अदानी समूहाचे (Adani Group) नाव जोडण्यात येत असून त्यावर अदानी समूहाने स्पष्टीकरण दिले आहे. बोगद्याच्या बांधकामात कंपनीचा किंवा त्यांच्या कोणत्याही उपकंपनीचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग नाही असं अदानी समूहाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे. तसेच काही घटकांकडून या खोट्या अफवा पसरवण्यात येत असून त्याचा निषेध करतो असंही अदानी समूहाने म्हटलं. 


उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये एक निर्माणीधान बोगदा (Uttarkashi Silkyara Barkot Tunnel Collapse) कोसळला असून त्यामध्ये 41 कामगार गेल्या 17 दिवसांपासून अडकलेले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून बचतकार्य अंतिम टप्प्यात आलं आहे. एकीकडे त्यांच्या सुटकेसाठी बचावकार्य सुरू असून दुसरीकडे या बोगद्याच्या कामाचा संबंध हा अदानी समूहाशी जोडण्याचा प्रयत्न सोशल मीडियावर केला जात आहे. त्यावर या गोष्टी म्हणजे निव्वळ अफवा असून अदानी समूहाचा किंवा त्यांच्या कोणत्याही उपकंपनीचा या बोगद्याच्या कामाशी कोणताही संबंध नाही असं अदानी समूहाने म्हटलं आहे.  


काय म्हटलंय अदानी समूहाने आपल्या निवेदनात? 


अदानी समूहाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, काही घटकांकडून उत्तराखंडमधील बोगद्याच्या दुर्दैवी दुर्घटनेशी अदानी समूहाचे नाव जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही या गोष्टीचा तीव्र निषेध करतो. बोगद्याच्या बांधकामात अदानी समूह किंवा त्याच्या कोणत्याही उपकंपन्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग नाही. तसेच बोगद्याच्या बांधकामात सहभागी असलेल्या कंपनीमध्ये आमचे कोणतेही शेअर्स नाहीत. या बोगद्यात अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.  


 






बोगद्यात 41 कामगार अडकले


त्तरकाशीतील बोगद्यात गेल्या 17 दिवसांपासून 41 कामगार बोगद्यात अडकले आहेत. दिवाळीच्या पहिल्या दिवशी बोगद्यामध्ये माती कोसळली आणि कामगार आतमध्ये अडकले आहेत. सिल्क्यरा बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठीचं रेस्क्यू ऑपरेशन अंतिम टप्प्यात आलं आहे. मात्र खोदकाम सुरू असताना तांत्रिक बिघाडामुळे बचावकार्य पुन्हा थांबवण्यात आलं आहे. 


नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF), उत्तराखंड स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO), नॅशनल हायवेज अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NHIDCL), जे प्रकल्प बांधत आहेत आणि इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP-Indo Tibetan Border Police) यासह विविध एजन्सी बचाव कार्यात सहभागी आहेत. लवकरच या कामगारांना बाहेर काढण्यात यश येईल.


ही बातमी वाचा: