नवी दिल्ली: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (आयआयटी) मुंबईकडून ग्रॅज्यूएट अॅप्टीट्यूट टेस्ट (GATE 2021) चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती ते विद्यार्थी  gate.iitb.ac.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपला निकाल पाहू शकता. 

GATE 2021 ची परीक्षा 6 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान आयोजित केली होती. या परीक्षेसाठी जवळपास 9 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील 75 टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.  GATE 2021 परीक्षेची प्रोव्हीजनल अंसर की 26 फेब्रुवारीला जाहीर केली होती.  कोरोनाचे सर्व नियम लक्षात घेऊन ही परीक्षा आयोजित केली होती. काल रात्री या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात 17.82 टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. 

विद्यार्थी आपला निकाल खालील लिंकवर क्लिक करुन पाहू शकतात 

GATE Result 2021 Direct Link 

असा पाहू शकाल निकाल 

अधिकृत वेबसाईट gate.iitb.ac.in वर जावेबसाईटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.आता अॅप्लिकेशन नंबर आणि जन्म तारीख टाकून लॉग इन कराआपला रिझल्ट आपल्या स्क्रिनवर दिसेलनिकाल चेक करा आणि त्याची प्रिंट घ्या