हरिद्वारचं गंगाजल ऑनलाईन बुक करा, घरपोच मिळवा
एबीपी माझा वेब टीम | 31 May 2016 02:01 AM (IST)
नवी दिल्ली : सर्वात पवित्र मानलं जाणारं गंगाजल घेण्यासाठी आता तुम्हाला उत्तर प्रदेशात जाण्याची गरज नाही. पोस्टाच्या माध्यमातून भाविकांच्या घरी गंगाजल पोहचवण्याची नवी योजना केंद्र सरकार लवकरच सुरु करणार आहे. ऑनलाईन बुकिंग करुन हरिद्वार आणि ऋषिकेषमधील गंगाजल घरपोच पाठवणं शक्य होणार आहे. दिल्लीत एका पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी यासंदर्भात घोषणा केली. या गंगाजलसाठी नागरिकांना किती रुपये मोजावे लागतील याचा निर्णय अद्याप झालेला नाही. इतकंच नाही, तर ही योजना कधी चालू होणार याबद्दलही कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.