G20 Summit Delhi Live : राजधानी दिल्लीतील आयोजित G 20 शिखर परिषदेच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी सर्वप्रथम मोरोक्को येथे झालेल्या दुर्वेवी भूकंपाबद्दल दु:ख व्यक्त केले. तसेच यावेळी आफ्रिकन युनिअनला जी20 परिषदेचे स्थायी सदस्य देण्यात आले. त्यामुळे आता यापुढे G20 नव्हे G21 म्हटले जाईल.  आज भारत पंडपममध्ये जगभरातील नेत्यांची मायंदळी पाहयाला मिळाली. दरम्यान, G20 परिषदेतही इंडिया नावाचा वापर दिसला नाही. मोदींसमोर भारत असं नाव लिहिलेलं होतं. त्याशिवाय मोदींकडून भारत असाच उल्लेख करण्यात आला.


जी-२० परिषदेसाठी आलेल्या सर्व प्रमुखांचं स्वागत. जवळच असलेल्या स्तंभावर 'मानवतेचं कल्याण व सुख नेहमीच सुनिश्चित केलं जायला हवं' असं लिहिलंय. अडीच हजार वर्षांपूर्वी भारताच्या भूमीनं हा संदेश जगाला दिला होता. मोदींनी दिला पहिल्याच भाषणात उक्तीचा संदर्भ.






मानवतेचा विकास केंद्रस्थानी असावा. अविश्वासाला विश्वासात बदलायचे आहे. G 20 मुळं मानवकेंद्रित आणि सर्वसमावेशक विकासाच्या नव्या वाटा खुल्या होतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.भारताकडे असलेलं अध्यक्षपद सर्वसमावेशक, महत्त्वाकांक्षी, निर्णायक आणि कृती-केंद्रित असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.


आता यापुढे G21 - 


यापुढे G20 ला G21 म्हटले जाईल. आफ्रिकन यूनियनला स्थायी सदस्यत्व देण्यात आलेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G20 च्या मंचावर याबाबतची घोषणा करण्यात आली.


भारतात होणाऱ्या G-20 परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली. आफ्रिकन युनियन आता या आंतरराष्ट्रीय समूहाचा कायमस्वरूपी सदस्य बनणार आहे. युरोपीय युनियन पाठोपाठ आता आफ्रिकन युनियन पण G-20 समूहाचा भाग बनणार आहे. त्यामुळे यापुढे G-20 ला G-21 म्हटले जाईल.


कठिण काळात भारत सर्वोतोपरी मदत करण्यासाठी तयार : पंतप्रधान मोदी 


G20 शिखर परिषदेत संबोधनाला सुरुवात करण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोरोक्को येथील भूकंपात प्राण गमावलेल्या लोकांच्या कुटुंबियांपैकी संवेदना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, "मोरोक्कोमध्ये भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर जिवीतहानी झाली आहे. हे वृत्त ऐकून अतिव दुःख झालं. या दुखःद प्रसंगी मोरोक्कोतील ज्यांनी आपले कुटुंबिय गमावले आहेत, त्याच्याप्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत. भारत या कठिण काळात मोरोक्कोला सर्वोतोपरी मदत करण्यासाठी तयार आहे."


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. ते म्हणाले की, अडीच हजार वर्षांपूर्वी भारताने जगला संदेश दिला होता. 'मानवतेचं कल्याण व सुख नेहमीच सुनिश्चित केलं जायला हवं' या संदेशाला आठवून जी20 परिषदेला सुरुवात करुयात.  सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याची ही वेळ आहे. कोरोना महामारीवेळी जगावर मोठं संकट आले होते, त्यावेळी विश्वासाचा अभाव असल्याचे जाणवलं. पण अविश्वासाला आता विश्वासाने जिंकायचे आहे.  आपण कोरोनाला हरवू शकतो, तर अविश्वासाच्या संकटालाही हरवू शकतो, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. सर्वांनी मिळून ग्लोबल ट्रस्ट डेफिसिटला विश्वासात बदलूयात. सर्वांना सोबत घेऊन चालायची ही वेळ आहे. सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास हा मंत्र आपल्यासाठी मार्गदर्शक ठरू शकतो. भारताचे G20 अध्यक्षपद हे देशामध्ये आणि देशाबाहेर सर्वसमावेशाच्या सबका साथचे प्रतीक बनले आहे.