भारत-पाकिस्तान सीमा कुठून कुठपर्यंत?
एबीपी माझा वेब टीम | 30 Sep 2016 08:10 AM (IST)
नवी दिल्ली : भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करुन 40 अतिरेक्यांचा खात्मा केला. भारताने सर्जिकल स्टाईक यशस्वी केल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय सीमा आणि एलओसीवर तणावपूर्ण वातावरण आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये 3 हजार 323 किलोमीटर लांबीची सीमा आहे. जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरात अशा चार राज्यांपर्यंत भारत-पाकिस्तान सीमा पसरली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये 1225 किलोमीटर लांब सीमा आहे, ज्यातील 740 किलोमीटर नियंत्रण रेषा (LOC) आहे. राजस्थानमध्ये 1037 किलोमीटर लांबीची आंतरराष्ट्रीय सीमा आहे, तर गुजरातमध्ये 508 किलोमीटर लांब सीमा, पंजाबमध्ये 553 किलोमीटर लांब सीमा आणि जम्मू-काश्मीरमध्ये 740 किलोमीटर लांब नियंत्रण रेषा आहे. 485 किलोमीटर लांबीची आंतरराष्ट्रीय सीमा जम्मू, सांबा आणि कठुआमध्ये आहे. ही सीमा कठुआ ते अखनूरपर्यंत पसरली आहे. 1972 मध्ये शिमला करारानुसार युद्धानंतर जो देश जिथपर्यंत होता, तिथेच राहून त्या जागेला नियंत्रण रेषा (LOC) संबोधलं गेलं. 740 किलोमीटर लांबीची सीमा नकाशावर आखण्यात आली. संबंधित बातम्या :