Kerala Mass Murder Case : आखाती देशामध्ये व्यवसाय करत असताना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावं लागल्यानंतर कर्ज फेडण्यासाठी घरी पैशाची मागणी करत होता. मात्र, घरच्यांनी कर्ज फेडण्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या 23 वर्षीय अत्यंत थंड डोक्याने प्रेयसीसह तब्बल सहा जणांची हातोडा आणि चाकूने निर्घृण हत्या केली. आरोपीने 47 वर्षीय कॅन्सरग्रस्त आईवरही हल्ला केला असून ती मृत्यूशी झुंज देत आहे. यानंतर आरोपी स्वत: विष प्राशन करून पोलिस स्टेशन गाठले आणि गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेनंतर अत्यंत थरकाप उडाला असून व्यवसायाच्या कर्जाच्या तणावात अवघ्या कुटुबांची राखरांगोळी केली आहे. पोलिसांनी विविध अँगलने या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. 

पोलिसांना आत्मसमर्पण करून गुन्ह्याची कबुली

केरळमधील तिरुअनंतपुरम येथील वेंजारामूडू येथे सोमवारी संध्याकाळी 23 वर्षीय तरुणाचा थरकाप समोर आला. आरोपीने प्रेयसी, भाऊ, आजी, काका, काकू यांचा चाकू आणि हातोड्याने वार करून निर्घृण खून केला. यानंतर आरोपीने आईवर हल्ला केला आणि तिलाही मारण्याचा प्रयत्न केला. आरोपीने पूर्ण नियोजन करून तीन वेगवेगळ्या ठिकाणी ही घटना घडवून आणली. त्यानंतर तो वेंजारामूडू पोलीस ठाण्यात गेला आणि त्याने आत्मसमर्पण केले आणि गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीने पोलीस ठाण्यात सांगितले की, त्याने आई आणि मैत्रिणीसह 6 जणांची हत्या केली आहे. अफान असे आरोपीचे नाव आहे.

आरोपींविरुद्ध दोन पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल 

दरम्यान, पोलिसांनी आतापर्यंत 5 जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे ज्यात आरोपीचा भाऊ अहसान, आजी सलमा बीवी, काका लतीफ, काकू शाहिदा आणि त्याची मैत्रीण फरशाना यांचा समावेश आहे. आरोपींविरुद्ध दोन पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. आरोपी अफान कर्जात बुडाला होता, कुटुंबाने मदत केली नाही, तरूण कर्जात बुडाला होता, कुटुंबाने ते फेडण्यास नकार दिला होता. या कारणावरून तरुणाने ही घटना घडवून आणली. आरोपीने पोलिसांना सांगितले की, तो आखाती देशात व्यवसाय करत असे, मात्र तेथे त्याचे मोठे नुकसान झाले. यामुळे मोठे कर्ज घेतले होते, परंतु कुटुंबाने मदत केली नाही, म्हणून सर्वांची हत्या केली. मात्र, आरोपीने काय सांगितले याबाबत पोलिसांना शंका आहे. आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. अफानचा मोबाईल फोन आणि कॉल डिटेल्स तपासले जात आहेत.

आईची प्रकृती चिंताजनक, आरोपीचाही आत्महत्येचा प्रयत्न

आरोपी अफानने त्याची आई शेमी (47 वर्षे) यांच्यावरही हल्ला केला. ती कॅन्सरची रुग्ण आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असून, सध्या तिरुवनंतपुरमच्या मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल आहे. त्याचवेळी अफानलाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. उंदराचे विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले होते.

इतर महत्वाच्या बातम्या