Pranab Mukherjee | माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण
एबीपी माझा वेब टीम | 10 Aug 2020 01:59 PM (IST)
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रणव मुखर्जी यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे.
नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रणव मुखर्जी यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. त्यांना दिल्लीच्या आर्मी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. प्रणव मुखर्जी यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहले की, इतर वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात गेले होते. रुग्णालयात कोरोना चाचणी केली होती. कोरोना चाचणीचा अहवाल आला असून कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. गेल्या आठवड्यात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी विलीगीकरणात तसेच कोरोना चाचणी करावी, अशी विनंती देखील त्यांनी केली आहे. देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना गेल्या आठवड्यात भाजपच्या पाच मोठ्या नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा, तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, भाजपचे यूपी प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव आणि उत्तर प्रदेशचे जलशक्ती मंत्री महेंद्र सिंह यांचा समावेश आहे.