केरळ : इस्रोचे माजी अध्यक्ष माधवन नायर यांनी अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कन्नूरमध्ये झालेल्या एका सभेत माधवन नायर यांच्यासह आणखी चार जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला. माधवन नायर यांना 1998 मध्ये पद्मभूषण आणि 2009 मध्ये पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.


मी राजकारणी नाही आणि भविष्यातही नसेन. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याने प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, असं नायर म्हणाले.


माधवन नायर हे सहा वर्षे इस्रोचे अध्यक्ष होते. इस्रोचे अध्यक्ष असताना माधवन यांच्या कार्यकाळात इस्रोने 25 अवकाश मोहिमा फत्ते केल्या आहेत. माधवन यांनी केरळ विद्यापीठात आपलं अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर मुंबईच्या भाभा अनुसंशोधन केंद्रात त्यांना प्रशिक्षण घेतलं.


इस्रोचं अध्यपदाची धुरा सांभाळण्याआधी माधवन यांनी अनके महत्त्वाच्या पदावर काम केलं होतं. माधव अवकाश विभागाचे सचिव आणि स्पेस कमिशनचे चेअरमन म्हणून काम पाहिलं होतं.