नवी दिल्ली : माजी आयपीएस अधिकारी आणि भाजप नेत्या किरण बेदी यांची पुद्दुचेरीच्या नायब राज्यपालपदी नियुक्ती  करण्यात आली.

 

किरण बेदी यांनी तीस वर्षांहून अधिक काळ पोलिस दलात काम केलं आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता. त्यानंतर किरण बेदी यांनी राजकारणात  प्रवेश केला.

https://twitter.com/thekiranbedi/status/734369645491294208

दिल्ली विधानसभेच्या 2015 मध्ये झालेल्या निवडणुका बेदी यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या गेल्या होत्या. मात्र या निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला.

 

दरम्यान, पुद्दुचेरीमध्ये काँग्रेस-द्रमुक आघाडीनं 30 पैकी 17 जागा जिंकून जयललिता यांच्या अण्णा द्रमुकचा दारुण पराभव केला. पुद्दुचेरीच्या नायब राज्यपालपदी नियुक्ती केल्याबद्दल किरण बेदी यांनी केंद्र सरकारचे आभार मानले.