2017 मध्ये तरुणीचं अपहरण केल्यानंतर तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप कुलदीप सिंह सेंगरवर आहे. त्यावेळी तरुणी अल्पवयीन होती. कोर्टाने सहआरोपी शशी सिंह विरोधातही आरोप निश्चित केले आहेत. उत्तर प्रदेशच्या बांगरमऊ विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा आमदार बनलेल्या सेंगरला या प्रकरणानंतर ऑगस्ट 2019 मध्ये निलंबित करण्यात आलं होतं. कोर्टाने 9 ऑगस्ट रोजी कुलदीप सेंगर आणि शशी सिंह विरोधात भारतीय दंड विधान कलम 363, 366, 376 ,506 आणि पॉक्सो कायद्याअंतर्गात गुन्ह्याची नोंद केली होती.
तीस हजारी कोर्टाने सीबीआयलाही खडेबोल सुनावले. कोर्टाने म्हटलं आहे की, स्वत:ची आणि कुटुंबीयांचे प्राण वाचवण्यासाठी या प्रकरणाची उशिरा नोंद केली. आम्ही पीडितेच्या मनाची स्थिती समजू शकतो. गँगरेप प्रकरणात सीबीआयने आरोपपत्र दाखल करण्यासाठी एक वर्ष का लावलं?
पीडितेवर प्राणघातक हल्ला
पीडित तरुणीच्या कारला 28 जुलै रोजी एका ट्रकने टक्कर मारली होती, ज्यात ती गंभीर जखमी झाली. दुर्घटनेत तरुणीचे दोन नातेवाईकांचाही मृत्यू झाला. षडयंत्र रचल्याचा आरोप तरुणीच्या कुटुंबीयांनी केला होता. सुप्रीम कोर्टाने उन्नाव बलात्कार प्रकरणात दाखल सर्व पाच खटले 1 ऑगस्टला उत्तर प्रदेशातील लखनौच्या कोर्टातून दिल्लीतील कोर्टात स्थलांतरित केले होते. या खटल्याची नियमित सुनावणी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.
भय इथले संपत नाही | महिला सुरक्षेबाबत महाचर्चा | नागपूर | ABP Majha