Foreign Universities in India :  मागील काही वर्षात अनेक भारतीय विद्यार्थी परदेशात जाऊन परदेशी विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत आहेत. आता या परदेशातील विद्यापीठांचे कॅम्पस (Universities Campus)भारतात सुरू करण्यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाने मान्यता दिली असून त्या संदर्भातील नियमावली जारी केली आहे. परदेशातील विद्यापीठ व उच्च शिक्षण संस्था भारतात आपले कॅम्पस सुरू करू शकते. त्यासाठी दहा वर्षांची मंजुरी यूजीसीकडून दिली जाणार आहे. 


 ऑनलाईन किंवा दुरस्थ अभ्यासक्रम (Distance Education) सुरू करता येणार नाही


सोबतच परदेशातील विद्यापीठांचे कॅम्पस जेव्हा भारतात सुरू होतील तेव्हा त्यांना ऑनलाईन किंवा दुरस्थ अभ्यासक्रम (Distance Education) सुरू करता येणार नाही, म्हणजे प्रत्यक्ष शिक्षण या परदेशातील विद्यापीठांना भारतात द्यावं लागेल. जेव्हा परदेशातील विद्यापीठांचे कॅम्पस भारतात सुरू होतील. तेव्हा त्यांना प्रवेश प्रक्रिया राबवणे ,त्यासोबतच विविध अभ्यासक्रमांचे शुल्क आकारणे यामध्ये पूर्णपणे स्वातंत्र्य दिले जाईल. मात्र, परदेशातील अभ्यासक्रम शिकवताना उत्तम दर्जाचे शिक्षण भारतातील विद्यार्थ्यांना मिळावं यासाठी पुरेपूर प्रयत्न करणे, यासाठी विद्यापीठाने प्रयत्न करावे अशा सूचना यूजीसी कडून देण्यात आले आहेत


परदेशातील विद्यापीठातील कॅम्पस भारतात सुरू करण्यासाठी काय असतील नियम ?


परदेशातील निधीची देवाणघेवाण परकीय चलन व्यवस्थापन कायद्यांतर्गत होईल.


परदेशी विद्यापीठे स्वतःची प्रवेश प्रक्रिया तयार करण्यास मोकळे असतील. फी देखील त्यांना स्वतः ठरवता येईल


परदेशी विद्यापीठांना दोन वर्षांत भारतात कॅम्पस सुरू करावे लागतील.


आयोगाकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर 45 दिवसांच्या आत कॅम्पस कार्यान्वित होणे आवश्यक आहे.


परदेशी विद्यापीठांना यूजीसीच्या वेबसाइटवर नोंदणी करावी लागेल.


परदेशातील विद्यापीठातील कॅम्पसमध्ये प्रवेश घेताना आरक्षणासंदर्भात यूजीसीने कुठलाही नियम लावलेला नाही


या परदेशातील विद्यापीठातील कॅम्पसमध्ये प्रवेश घेताना आरक्षणासंदर्भात यूजीसीने कुठलाही नियम लावलेला नाही. 'ज्या विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचं स्वप्न असतं. मात्र आर्थिक परिस्थिती किंवा इतर काही कारणांमुळे ते स्वप्न साकार करणं शक्य होत नाही. अशा विद्यार्थ्यांना एक मोठी संधी या निर्णयामुळे निर्माण झाली आहे', असं करिअर कौन्सिलर सुचित्रा सुर्वे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं


मात्र परदेशातील विद्यापीठांचे कॅम्पस भारतात सुरू करताना तशा प्रकारची वातावरण निर्मिती, तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग ,करिअरच्या उत्तम संधी, सोई सुविधा आणि प्लेसमेंट याचा सुद्धा विचार प्रवेश घेताना विद्यार्थी आणि पालक करतील. त्यामुळे परदेशातील विद्यापीठांच्या दर्जाच शिक्षण या कॅम्पसमध्ये मिळावं अशी अपेक्षा या निर्णयानंतर असणार आहे.


ही बातमी देखील वाचा


Foreign Universities in India : भारतात परदेशी विद्यापीठांना दारं खुली; प्रवेश फीचं स्वातंत्र्य, आरक्षणाचीही अट नाही


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI