Omicron: दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं जगाची चिंता वाढवलीय. ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं विविध देशांनी कोरोनाचे निर्बंध कडक केले आहेत. दरम्यान, भारतातही ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढू होऊ लागल्यानं देशातील सार्वजनिक कार्यक्रमात योग्य ती काळजी घेतली जात आहे. याचपार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी दोन वेगवेगळ्या कार्यक्रमात हजेरी लावली. नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम उत्तर प्रेदश येथे पार पडला. तर, अमित शाहांनी महाराष्ट्रातील अहमदनगर येथे झाला. परंतु, नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमात कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्यात आलं. तर, अमित शाहांच्या कार्यक्रमात कोरोना नियमांचा विसर पडल्याचं पाहायला मिळालं. अमित शाहांच्या कार्यक्रमातील व्यासपीठावर अनेक नेते विनामास्क फिरताना दिसल्यानं सोशल मीडियावर चर्चा सुरू झालीय.
देशातील ओमयाक्रॉनबाधित रुग्णांची संख्या शंभरीपलीकडे गेलीय. सध्या देशातील ओमायक्रॉन बाधितांच्या संख्यानं 113 चा आकडा गाठलाय. ओमायक्रॉनचा धोका टाळण्यासाठी सरकारकडून कठोर पावले उचलली जात आहेत. दरम्यान, विनामास्क फिरणाऱ्यांवर किंवा कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधातही कडक कारवाई केली जात आहे. विशेषत: उत्तर प्रदेशमध्ये ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळल्यानं नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमात कोरोना नियमांचं पालन करण्यात आलंय. पण महाराष्ट्राच्या अहमदनगरमध्ये अमित शाहांच्या उपस्थित झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावरील नेत्यांनी मास्क लावण्याचं टाळलंय. यामुळं महाराष्ट्रात ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना अमित शाहांच्या कार्यक्रमात कोरोना नियमांकडे दुर्लक्ष का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
व्हिडिओ-
''11 राज्यात ओमायक्रॉन व्हेरियंटने शिरकाव केला आहे. मागील 20 दिवसांत देशातील दैनंदिन नव्या कोरोना रुग्णांची नोंद दहा हजारांपेक्षा कमी झाली आहे. पण ओमायक्रॉनचं स्वरुप आणि इतर देशातील वाढत्या ओमायक्रॉन रुग्णाची संख्या पाहाता आपल्याला सतर्क राहण्याची गरज आहे'', अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिलीय.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha