अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबादमध्ये गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अहमदाबादमधील विविध ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. अहमदाबाद विमानतळाचं तर नदीत रुपांतर झाले आहे.
अहमदाबाद विमानतळावर साचलेल्या पाण्यामुळे रनवेवर विमानं उतरणं अशक्य होऊन बसलं आहे. त्यामुळे अनेक विमान सेवा रद्द कराव्या लागल्या आहेत.
मुसळधार पावसामुळे प्रशासनाने शाळांना सुट्टी घोषित केली आहे. शिवाय, पाणी साचत असल्याने उपाययोजनांकडेही लक्ष दिले जात आहे.
अहमदाबादमधील वस्त्राल, निकोल, वटवा, मनीनगर, चांदलोडिया, साबरमती यांसारख्या परिसरात पाणी साचल्याने लोकांना घराच्या बाहेर पडणंही कठीण झाले आहे.
एनडीआरएफची पथकं मदतकार्यासाठी अहमदाबादेत दाखल झाली आहेत.
अहमदाबादमध्ये ‘कोसळधार’, विमानतळावर पाणीच पाणी!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Jul 2017 07:28 PM (IST)
गुजरातमधील अहमदाबादमध्ये गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अहमदाबादमधील विविध ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. अहमदाबाद विमानतळाचं तर नदीत रुपांतर झाले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -