Goa Assembly Elections 2022 : पणजी : पुढील वर्षी गोव्यासह सात विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगानं अद्याप तारखांची घोषणा केली नाही. मात्र, प्रचाराला सुरुवात झाली आहे. काँग्रेसने यामध्ये एक पाऊल पुढे टाकत पहिल्या टप्यातील मतदारांची नावं जाहीर केली आहेत. पूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षानं आपल्या आठ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. सर्वात अगोदर उमेदवार जाहीर करून आघाडी घेण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केला आहे. पहिल्या टप्प्यात आठ उमेदवारांच्या नावाची घोषणा झाली असून लवकरच इतर उमेदवारांची यादी होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.


जसं जसं गोवा विधानसभा निवडणूक जवळ येऊ लागली तसं तसं राज्यातील राजकारणानं वेग घेतलाय. सत्तेसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. केजरीवालांचा आप तर ममताचा तृणमूलही आपलं नशीब अजमावणार आहे. स्थानिक पक्षांनीही कंबर कसली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. मतदारांना आकर्षीत करण्यासाठी सर्व पक्ष तयारी करत आहेत. भाजप, काँग्रेससह तृणमृल काँग्रेस या पक्षाचे राष्ट्रीय नेतेही गोवावारी करत आहेत.


कुणाला मिळालं तिकीट?
गोवा विधानसभा निवडणुकीसाठी म्हापशातून सुधीर कानोलकर, तळैगाव मतदारसंघातून टोनी रॉड्रिग्ज, पोंडामधून राजेश वेरेणकर, मरमुगाव मतदारसंघातून संकल्प अमोणकर, कुर्तोरिममधून अलेक्सो ल्युरेन्को, मडगावमधून दिगंबर कामत, Cuncolim मधून युरी आलेमाव तर Quepem मधून अल्टोन डिकोस्टा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. 






ABP C Voter Survey : उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपुरमध्ये  पुढील वर्षी विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर एबीपी न्यूजने सी व्होटरच्या सर्व्हेच्या माध्यमातून जनतेचा कौल जाणून घेतलाय. गोव्यात विधानसभा निवडणुकीच्या एकूण 40 जागा आहेत. भाजप, काँग्रेस, आप, तृणमूल काँग्रेस या पक्षांसह स्थानिक पक्षही आपलं नशीब अजमाणवार आहेत... पाहा सी व्होटरच्या सर्व्हेच्या माध्यमातून जनतेचा कौल काय आलाय?
गोव्यात कुणाला किती मतं?
भाजप-30%
काँग्रेस-20%
आप-24%
इतर - 26%


गोव्यात कुणाला किती जागा मिळणार?
भाजप-17-21
काँग्रेस-4-8
आप- 5-9
इतर - 6-10


मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live 



संबधित बातम्या : 


ABP-C Voter Survey : भाजप, काँग्रेस की आप, गोव्यात कुणाची येणार सत्ता?   


C Voter Survey : पाच राज्याचा महासर्व्हे! कुणाचं सरकार, कोण मुख्यमंत्री, कुणाला धक्का?