श्रीनगर : उत्तर काश्मीरमधील बांदीपुरा जिल्ह्यात दहशतवादी आणि सैन्यदलाच्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आलं आहे. या चकमकीत सीआरपीएफचे 3 जवानही शहीद झाले आहेत. बांदीपुरामधील चकमकीत आणखी 6 जवान आणि एक स्थानिक नागरिक जखमी झाले आहेत.


बांदीपुरातील हाजिन भागातील पारे परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सैन्याना मिळाली होती. त्यामुळे सैन्यानं हा सारा परिसर घेरला होता. मात्र सैन्यदलानं परिसर घेरल्याची माहिती मिळताच दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार सुरु केला.

आठवड्याभरात दुसऱ्यांदा दहशतवाद्यांशी सैन्याची चकमक झाली आहे. दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत रविवारी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला होता, तर दोन जवान शहीद झाले आहेत. काश्मीरच्या यारीपोरा भागात भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत सैन्य दलानं चोख प्रत्यूत्तर दिलं होतं.

संबंधित बातम्या :

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत दोन जवान शहीद