अरुण जेटली हेलिकॉप्टरमध्ये चढताना घसरले, किरकोळ जखमी
एबीपी माझा वेब टीम | 12 Mar 2017 05:13 PM (IST)
हरिद्वार : हेलिकॉप्टरमध्ये चढताना हात सुटल्याने केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली घसरले आणि खाली पडल्यानंतर ते बेशुद्ध पडले. या घटनेत त्यांना किरकोळ जखम झाली असून, आता ते सुखरुप आहेत. अरुण जेटली यांची पतंजलीच्या डॉक्टरांनी तपासणी केली असता, जेटली यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाल्याचं समोर आले. या घटनेनंतर जेटलींना दिल्लीला आणण्यात आले. अर्थमंत्री अरुण जेटली हे रामदेव बाबा यांच्या पतंजलीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी उपस्थित होते. योगग्रा येथून पदार्था फूड येथे ते आले होते. पदार्थाहून दिल्लीकडे रवाना होण्यासाठी जेटली हेलिकॉप्टरमध्ये चढत होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली. अरुण जेटली यांना किरकोळ जखम झाली असून, ते आता पूर्णपणे सुखरुप आहेत.