मोदींनी त्याआधी गढवा घाट आश्रमात गोसेवा केली. यावेळी संतांनी पंतप्रधानांना घातलेल्या रुद्राक्षाच्या माळेने सगळ्याचंच लक्ष वेधून घेतलं.
गढवा घाट आश्रमांच्या अनुयायांमध्ये यादवांची संख्या मोठी आहे. अंदाजे एक कोटीहून भाविक या आश्रमाचे अनुयायी आहेत. त्यामुळे त्याचा राजकीय अर्थही काढला जातो. त्यानंतर मोदींनी रोड शो केला.
वाराणसीच्या चिंचोळ्या गल्ल्यांमधून मोदी पायी जात होते आणि गल्ल्यांच्या दुतर्फा गच्चीमधून मोदींवर पुष्पवृष्टी सुरु होती. याच गल्ल्यांमधून वाट काढत मोदींनी लाल बहादूर शास्त्रींच्या घराला भेट देली. वाराणसीतल्या या रोड शोनंतर मोदींची आणखी एक विराट सभा झाली.
बुधवारी उत्तर प्रदेशच्या अखेरच्या टप्प्याचं मतदान
शेवटच्या टप्प्यातील 40 जागांवर 2012 च्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा समाजवादी पक्षाने जिंकल्या होत्या. या निवडणुकीत समाजवादी पक्षाने या भागातून 23 जागांवर विजय मिळवला. तर बसपा 5, भाजप 4, काँग्रेस 3 आणि अपक्षांनी 5 जगांवर विजय मिळवला होता.
मात्र, यंदा समाजवादी पक्षासमोर भाजपचं तगडं आवाहन आहे. पंतप्रधान मोदींचाच मतदार संघ असलल्याने भाजपनेही आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे. आता या भागातून भाजपला कितपत यश मिळेल? याकडे सर्व राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशसह पाचही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल 11 मार्च रोजी घोषित होणार आहेत.
संबंधित बातम्या