फेविकॉलने क्रिस्टियानो रोनाल्डो आणि कोका-कोला वादाला एक वेगळा अँगल देऊन त्याचा वापर आपल्या जाहिरातीसाठी केला आहे. फेविकॉल ब्रँडने एक मजेदार जाहिरात तयार करण्यासाठी या वादाचा वापर केला आहे. फेविकॉलने ट्विटरवर ही जाहिरात शेअर केली आहे.
ही जाहिरात आता सोशल मीडियावर खूप पसंत केली जात आहे. खरं तर, फेविकॉलच्या जाहिरातीमध्ये दोन Adhesive बॉटल फोटोशॉप करुन प्रेस कॉन्फरन्स टेबलवर ठेवल्या आहेत. त्याचवेळी, जाहिरातीसह कॅप्शनमध्ये 'ना बॉटल हलणार, नाही मूल्यांकन घसरणार' असे लिहिले आहे. तसेच, 'हाय नी मेरा कोका कोका कोका कोका' लिहून त्यांनी कोका-कोला कंपनीला लक्ष केलं आहे.
माहितीनुसार, नुकत्याच एका प्रेस कॉन्फरन्समध्ये स्टार फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डोने कोका कोलाच्या दोन बॉटल टेबलवरुन बाजूला ठेवत पाण्याची बोटल समोर ठेवली. या कृतीमुळे रोनिल्डोची पत्रकार परिषद संपण्याच्या अगोदर कोका कोलाचे शेअर $56.10 वरुन $55.22 पर्यंत खाली आले. यात कंपनीला सुमारे 400 कोटी रुपयांचा फटका बसला. या घटनेनंतर लोकांनी रोनाल्डोच्या कोका कोला स्नॅप वर मिम्स बनवण्यास सुरूवात केली. यात आता फेविकॉलचा समावेश झालाय.
यूजर्सकडून ट्विटवर प्रतिक्रियांचा पाऊस
फेविकॉलची जाहिरात असलेल्या ट्विटने मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर 21,000 पेक्षा जास्त 'लाईक्स' मिळविल्या आहेत आणि लोकं ब्रँडच्या मार्केटींग पध्दतीची प्रशंसा करीत आहेत.
यूजर्सच्या रिअॅक्शन
फेवीकोलच्या नवीन जाहिरातीचे नेटकरी कौतुक करीत आहेत. उद्योगपती हर्ष गोएंका यांनी यावर भाष्य केले असून याचे वर्णन 'शानदार मार्केटींग' असे केले आहे. त्याचवेळी, एका वापरकर्त्याने लिहिलंय की 'फेविकॉलच्या जाहिराती 2 दशकांहून अधिक काळ सातत्याने नेत्रदीपक आहेत'. खरं तर, फेविकॉलने आपल्या सर्जनशील जाहिरात मोहिमेद्वारे भारतीयांच्या अनेक पिढ्यांचे मनोरंजन केले आहे.