जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी बुधावारी पाकव्याप्त काश्मीरबाबत एक वादग्रस्त विधान केलं आहे. पाकव्याप्त काश्मीरवर तोडगा निघावा यासाठी भारत सरकारचे गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न सुरु आहेत. याविषयी बोलताना फारुख अब्दुलांचा तोल घसरला. 'पाकव्याप्त काश्मीरवर अधिकार असायला तो काय भारताच्या बापाचा आहे का?' असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं.


काश्मीरमधील एका आयोजित कार्यक्रमात बोलताना फारुख अब्दुल्ला यांची जीभ घसरली. पाकव्याप्त काश्मीरबाबत बोलताना अब्दुला म्हणाले की, 'सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानचा कब्जा आहे. ('क्या ये तुम्हारे बाप का है?') ही काही भारताला पूर्वजांकडून मिळालेली संपत्ती नाही. की जिच्यावर तुम्ही दावा करावा.' असं वक्तव्य त्यांनी त्यावेळी केलं.

'भारत सरकारकडे पाकिस्तानशी बोलणी करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. 'असंही फारुख अब्दुल्ला म्हणाले. या कार्यक्रमात त्यांचा मुलगा ओमर अब्दुल्ला हे देखील उपस्थित होते.