Farmers Protest:  तीन कृषी कायदे मागे घेण्याचे विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर आता वर्षभरापासून सुरू असलेले शेतकरी आंदोलन मागे घेणार असल्याची चर्चा सुरू आहे. या दरम्यान शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी आंदोलनाबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. पुढील महिन्यात शेतकरी आंदोलनाची सांगता होऊ शकते असे त्यांनी म्हटले. 


'एबीपी न्यूज' सोबत बोलताना राकेश टिकैत यांना शेतकरी आंदोलन कधी मागे घेतले जाणार याबाबत विचारण्यात आले होते. यावेळी टिकैत यांनी म्हटले की, पुढील महिन्याच्या अखेरीस आंदोलनाची सांगता होऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल असे वचन दिले आहे. मात्र, 1 जानेवारीपर्यंत किमान हमी भावाचा कायदा झाला नाही तर हा मुद्दादेखील शेतकरी आंदोलनाचा मुख्य मुद्या होईल. मात्र, सरकार असे होऊ देणार नाही. त्यामुळे पुढील महिन्यात आंदोलन मागे घेतले जाईल असे सरकारने म्हटले. 


टिकैत यांनी म्हटले की, सध्या तरी एकाही शेतकऱ्याला माघारी जायचेन नाही. सध्या सरकारच्या बाजूने वातावरण निर्मिती सुरू आहे. काही दिवसानंतर सरकारला जाग येईल आणि 10-11 तारखेनंतर चर्चा सुरू होईल. सरकार किमान हमी भावावर कायदाही तयार करेल, शेतकऱ्यांवरील खटले मागे घेतले जातील. कोणताही शेतकरी अंगावर असलेले आंदोलनाचे गुन्हे मागे घेतल्याशिवाय जाणार नाही, असे टिकैत यांनी म्हटले. 


सिंघू सीमेवर 1 डिसेंबर रोजी बैठक


शेतकऱ्यांचा एक घटक आंदोलन संपवण्यासाठी पुढाकार घेत असताना इतर शेतकरी नेते इतर मागण्यांबाबत आंदोलन सुरूच ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. एक डिसेंबर रोजी संयुक्त किसान मोर्चाची बैठक पार पडणार आहे. त्याशिवाय चार डिसेंबर रोजीदेखील एक बैठक होणार आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:


'हमीभाव घेतल्याशिवाय शांत बसणार नाही', मुंबईतील महापंचायतीमध्ये शेतकरी नेत्यांचा एल्गार


Farmers Protest : कृषी सुधारणांसाठी दिल्लीत लाखभर शेतकरी घेऊन पोहचू, सुप्रीम कोर्टाच्या मध्यस्थी समितीच्या अध्यक्षांचा इशारा