नवी दिल्ली : ख्यातनाम शहनाईवादक भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांचे तिसरे पुत्र उस्ताद जामिन खाँ यांचं आज निधन झालं. ते 74 वर्षांचे होते. शनिवारी सकाळी कालीमहल स्थित राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या पश्च्यात त्यांची पत्नी, पाच मुली आणि एक मुलगा आफाक हैदर असा परिवार आहे.
जामिन यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना किडनीचा आजार होता. तर, गेल्या दोन वर्षांपासून ते मधुमेह आणि इतर आजारांचा सामना करत, असल्याची माहिती जामिन यांच्या कुटुंबीयांनी दिली.
उस्ताद जामिन हुसैन यांनी आपल्या शहनाई वादनाने सर्वांचीच दाद मिळवली होती. त्यांच्या शहनाईवादनाचे देश-विदेशात चाहते होते. त्यामुळे जामिन यांच्या निधनाने सर्वत्र शोक व्यक्त होत आहे.
जामिन साहेबांच्या निधनानंतर उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांची शहनाई वादनाची परंपरा पुढे नेणारे, त्यांचे नातू आफाक हैदर हे एकमेवच असल्याची माहिती जामिन यांच्या निकटवर्तींयांनी दिली.
भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांचे पुत्र जामिन हुसैन खाँ कालवश
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Feb 2018 05:21 PM (IST)
उस्ताद जामिन हुसैन यांनी आपल्या शहनाई वादनाने सर्वांचीच दाद मिळवली होती. त्यांच्या शहनाईवादनाचे देश-विदेशात चाहते होते. त्यामुळे जामिन यांच्या निधनाने सर्वत्र शोक व्यक्त होत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -