अश्लील फोटो व्हायरलप्रकरणी आरोपीनं स्वतःसह साक्षीदार तरुणीलाही पेटवलं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Feb 2018 03:36 PM (IST)
खटल्यात आपल्या विरोधात साक्ष देऊ नये म्हणून एका गुन्हेगारानं स्वत:ला पेटवून घेत साक्ष देणाऱ्या तरुणीलाही पेटवल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातल्या छिंदवाडामध्ये घडली आहे.
NEXT
PREV
छिंदवाडा, मध्यप्रदेश : खटल्यात आपल्या विरोधात साक्ष देऊ नये म्हणून एका गुन्हेगारानं स्वत:ला पेटवून घेत साक्ष देणाऱ्या तरुणीलाही पेटवल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातल्या छिंदवाडामध्ये घडली आहे. हा सर्व प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
काही दिवसांपूर्वी नवनीत नावाच्या व्यक्तीने एका मुलीचे अश्लील फोटो इंटरनेटवर व्हायरल केले होते. याप्रकरणी या मुलीच्या मैत्रिणीनं कोर्टात साक्ष दिली. यानंतर नवनीत नावाच्या या व्यक्तीला बेड्याही ठोकण्यात आल्या. मात्र, जेलमधून बाहेर आल्यानंतर त्याने साक्षीदार असणाऱ्या निकिता नखाते नावाच्या मुलीवर साक्ष बदलण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली.
निकिताने त्याचं न ऐकल्यानं शेवटी त्यानं तिच्या वाढदिवसाच्या पार्टीत शिरुन स्वत:ला पेटवून घेतलं आणि निकीतालाही आपल्या जवळ ओढलं. दरम्यान, हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी वेळीच दोघांवरही पाणी ओतलं. पण या घटनेत निकितासह हा आरोपीही गंभीर जखमी झाला आहे.
त्या दोघांनांही उपचारासाठी नागपूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून याप्रकरणी छिंदवाडा पोलिसांनी गुन्हा केला आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -