नवी दिल्ली : संसदेतील अविश्वास ठरावातील विरोधकांचा पराभव ही 2019 च्या लोकसभा निवडणुकीची झलक आहे. यातून मोदी सरकारच्या ‘सबका साथ सबका विकास’चा विश्वास दिसून येतो, असं भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी म्हटलं आहे. शिवाय हा लोकशाहीचा विजय असून घराणेशाहीचा पराभव असल्याचंही ते म्हणाले.
अविश्वास ठराव पडल्यानंतर अमित शाहांनी ट्वीट केलं. ''मोदी सरकारचा हा विजय लोकशाहीचा विजय आहे आणि घराणेशाहीच्या राजकाराणाचा पराभव आहे,'' असं अमित शाह म्हणाले.
''घराणेशाहीचं राजकारण आणि जातीवादाला चालना देणाऱ्या काँग्रेसचा पुन्हा एकदा गरीब कुटुंबातून येणाऱ्या पंतप्रधान मोदींविषयीचा तिरस्कार उघड झाला,'' असल्याची टीका अमित शाहांनी केली.
''जनतेच्या विश्वासावर अविश्वास दाखवणाऱ्या अहंकाराचा लोकसभेत जो पराभव झाला, तो 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील निकालाची झलक आहे. ‘सबका साथ सबका विकास’ या मंत्रामुळे केवळ मोदींवर सहकाऱ्यांचाच नाही, तर देशाचा विकास आहे,'' असं अमित शाह म्हणाले.
''काहीही मुद्दा हातात नसताना आणि बहुमत नसताना अविश्वास ठराव आणून काँग्रेसने आपली राजकीय दिवाळखोरी जाहीर केली. शिवाय लोकशाहीला पायदळी तुडवण्याच्या आपल्या इतिहासाचीही पुनरावृत्ती केली. सरकारवर देशाचा पूर्ण विश्वास आहे,'' असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली.
अविश्वास ठरावात मोदी सरकारचा विजय
मोदी सरकारविरोधातला पहिला अविश्वास ठराव लोकसभेत पडला. सरकारच्या बाजूने 325 मतं पडली, तर विरोधकांच्या बाजूने केवळ 126 सदस्य होते. एकूण 451 सदस्यांनी या मतदानात भाग घेतला. बीजेडी आणि शिवसेनाने मतदानाला गैरहजेरी लावली.
विरोधकांचा पराभव ही 2019 ची झलक : अमित शाह
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Jul 2018 09:51 AM (IST)
काँग्रेसवर घराणेशाहीची टीका करत हा लोकशाहीचा विजय असल्याचं अमित शाह म्हणाले. अविश्वास ठराव हा 2019 च्या लोकसभा निवडणुकीची झलक असल्याचं ते म्हणाले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -