नवी दिल्ली : सीबीएसई दहावीच्या गणित विषयाची फेरपरीक्षा पुन्हा होणार नाही. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने आज गणिताच्या फेरपरीक्षेचा निर्णय बदलला. त्यामुळे दिल्ली आणि हरियाणा विभागांमध्येही गणिताची फेरपरीक्षा होणार नाही.


उत्तरपत्रिकांचं मूल्यांकन आणि विश्लेषण केल्यानंतर त्यात पेपरफुटीचा परिणाम फार जाणवलेला नाही. त्यामुळे फेरपरीक्षा न घेण्याचा निर्णय घेतल्याचं, सीबीएसईने स्पष्ट केलं. या निर्णयामुळे देशभरातील दहावीच्या 16 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

मात्र सीबीएसई बारावी अर्थशास्त्राच्या पेपरबाबत अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही.

गणित आणि अर्थशास्त्राचा पेपर फुटला!
दहावीचा गणिताचा पेपर 28 मार्चला झाला होता. तर बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर 27 मार्चला घेण्यात आला होता. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये, यासाठी दोन्ही विषयांची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय बोर्डाने घेतला. मात्र फेरपरीक्षेला विद्यार्थ्यांसह पालकांनीही विरोध केला होता.

मुलांना फेरपरीक्षेला बसवू नका : राज ठाकरे
कुठल्याही परिस्थितीत तुमच्या मुलांना सीबीएसईच्या फेरपरीक्षेला बसवू नका, असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशभरातील पालकांना केलं आहे.

पण पेपर फुटीमध्ये सरकाराचा अक्षम्य हलगर्जीपणा असल्याचं मनसे अध्यक्षांनी सांगितलं. राज ठाकरे यांनी या मुद्द्यावर प्रसिद्धीपत्रक जारी करुन पालकांनी आपल्या मुलांना फेरपरीक्षेला बसवू नका, असं आवाहन केलं.

संबंधित बातम्या

सीबीएसईच्या दहावी आणि बारावी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

सीबीएसईचा मोठा निर्णय, 10 वी, 12 वीचे फुटलेले पेपर पुन्हा होणार!

मुलांना सीबीएसई फेरपरीक्षेला बसवू नका : राज ठाकरे

CBSE चे फुटलेले पेपर गरज पडल्यास फक्त दिल्ली, हरियाणात होणार

सीबीएसई पेपरफुटी : विद्यार्थी-पालकांकडून राज ठाकरेंचे आभार