नवी दिल्ली : 'वन रँक, वन पेंशन'च्या मागणीसाठी नवी दिल्लीत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रामकिशन ग्रेवाल असं या माजी सैनिकाचं नाव आहे.

ग्रेवाल यांनी सोमवारपासून दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर आपल्या सहकाऱ्यांसह सातव्या वेतन आयोगानुसार 'वन रँक, वन पेंशन' देण्यात यावं, यासाठी धरणं आंदोलन सुरु केलं होतं.



मात्र आंदोलनाकडे कुणीही लक्ष न दिल्याने त्यांनी आत्महत्या केली, असा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. संरक्षण मंत्र्यांना देण्यासाठी लिहिलेल्या पत्रावरच ग्रेवाल यांनी सुसाईड नोट लिहिली आहे.



''देशासाठी, मातृभूमीसाठी, देशाच्या वीर जवानांसाठी माझे प्राण अर्पण करतो'', असं ग्रेवाल यांनी लिहिलं आहे.