EPFO News : प्रत्येक नोकरदार असलेल्या व्यक्तिंसाठी महत्वाची बातमी आहे. आपण जर नोकरी करत असाल तर आपल्या पीएफ संदर्भात काही गोष्टींचं पालन न करणं आपल्याला चांगलंच महागात पडू शकतं. जर खाली सांगितलेल्या पाच गोष्टी आपण पूर्ण केलेल्या नसतील तर आपल्या पीएफची पूर्ण रक्कम (PF Withdrawal) अडकून पडू शकते.  EPFO आपल्याला चांगल्या व्याजदरासह सेव्हिंगचे देखील ऑप्शन दिले जातात. आपण क्लेम (EPFO Claim) केल्यानंतर आपला क्लेम तीन दिवसांमध्ये क्लिअर करुन पाच दिवसांच्या आत पैसे अकाऊंटवर जमा होतात. मात्र जर आपल्या पीएफ अकाऊंटवर काही गोष्टी पूर्ण केल्या नाहीत तर आपले पैसे काढण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात.  


हे देखील वाचा - PF Account : नोकरी सोडताना पीएफचे पैसे लगेच काढू नका, तुमचाच तोटा होईल


पीएफ अकाऊंटसंबंधी या पाच गोष्टींची पूर्तता नक्की करा 


बँक अकाऊंटची माहिती अचूक भरा 
जर आपल्या पीएफ अकाऊंटशी आपण दिलेला बँक अकाऊंट चुकीचा जोडला असेल तर आपल्याला पीएफचे पैसे मिळणार नाहीत. आपण ज्या बँक अकाऊंटला पीएफ खात्याशी जोडलं आहे त्याच खात्यात आपले पैसे जमा होतील. जर डिटेल्स चुकीचे असतील तर पैसे जमा होणार नाहीत. आणि आपला क्लेम रिजेक्ट होईल.  ईपीएओवर जोडलेला बँक अकाऊंट अचूक असणे आणि तो UAN (यूनिवर्सल अकाउंट नंबर)सोबत लिंक असणं आवश्यक आहे. 


हे ही वाचा- PF Balance Check: आपल्या पीएफ खात्याचा बॅलन्स काही मिनिटात चेक करा, 'हे' चार पर्याय वापरा


केवायसी पूर्ण करा
सोबतच आपला केवायसी जर आपण पूर्ण केला नसेल तरीही आपले पैसे अडकू शकतात.  केवायसी डिटेल्स पूर्ण आणि व्हेरिफाय नसेल तर आपला पीएफ विड्रॉल होऊ शकणार नाही.  


जन्मतारीख चुकीची असल्यास
EPFO मध्ये दिलेली आपली  जन्मतारीख आणि एम्प्लॉयरच्या रेकॉर्डमध्ये दिलेली जन्मतारीख वेगवेगळी असेल किंवा चूक असेल तर आपला पीएफ विड्रॉलचा क्लेम रद्द होऊ शकतो.  EPFO नं एक सर्कुलर जारी करत एम्प्लॉयरची जन्मतारीख चुकीची असेल तर ती अचूक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या.  


UAN आधारशी लिंक नसेल तर 
जर आपला UAN (यूनिवर्सल अकाउंट नंबर) आधारशी लिंक नसेल तर आपला पीएफ विड्रॉल होऊ शकणार नाही.  


अटी पूर्ण न केल्यास
जर तुम्ही आर्थिक अडचणींमुळं आपला पीएफ विड्रॉल करत असाल तर यासाठी तुम्हाला तीन अटी पूर्ण कराव्या लागतील. 1.UAN अॅक्टिव्हेट होणं आवश्यक, 2. अकाऊंट आधार व्हेरिफाईड असावं आणि  UAN लिंक असावं, 3. अचूक IFSCसोबत बँक अकाऊंट लिंक असावं. सोबतच सदस्याची सही स्पष्ट असावी आणि ती रेकॉर्डशी मॅच होणारी असावी अन्यथा आपला क्लेम रद्द होऊ शकतो.