Assam Wild Elephant Attacked : जंगली प्राण्यांचा अलिकडे मानवी वस्तीत वावर वाढला आहे. जंगतालून मानवी वस्तीत येऊन नागरिकांवर हल्ले करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशीच एक धक्कादायक घटना नुकतीच आसाममध्ये घडली आहे. जंगली हत्तीने एका 30 वर्षाच्या तरूणावर हल्ला केला आहे. या हत्तीने संबंधित तरूणाचा पाठलाग करून त्याला सोंडेत पकडून जमिनीवर फेकून दिले. जीव वाचवण्यासाठी हा तरूण खूप धावत आहे. परंतु, हत्तीच्या तावडीतून त्याला आपली सुटका करून घेता आली नाही. या थरारक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


आसामच्या धुबरी जिल्ह्यातील तामारहट परिसरात 18 डिसेंबर रोजी ही घटना घडली आहे. एक जंगली हत्ती तरूणाचा पाठलाग करत आहे. जीव वाचवण्यासाठी तरूण धावत आहे. परंतु, हत्तीने त्याला सोंडेत पकडून जमिनीवर फेकून दिले. हत्तीच्या हल्ल्यात तरूण गंभीर जखमी झाला आहे. एका वनअधिकाऱ्याने सांगितले की, जखमी तरूणाला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले आहे आणि हत्तीला जंगलाकडे हकलून लावले आहे. 


आसाममध्ये हत्ती आणि मानवाचा संघर्ष वाढला
देशात सर्वात जास्त हत्तींचा वावर असलेल्या आसाममध्ये  जंगलातील शेतीचे नुकसान होत असल्याने हत्ती आणि स्थानिक लोकांमधील संघर्ष वाढला आहे. या वर्षी रेल्वेला धडकून, वीजेचा शॉक लागून, खड्ड्यात पडून जवळपास 71 हत्तींचा मृत्यू झाला आहे. तर मानसांसोबतच्या संघर्षात 61 हत्तींचा मृत्यू झाला आहे. 


दरम्यान, याआधी छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यात जंगली हत्तींच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. हत्तींनी यावेळी अनेक घरांचेही नुकसान केले आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कटघोरा वनमंडलच्या परिसरातील बुमबहरा गावात गुरूवारी  रात्री हत्तींनी कुंवरिया नावाच्या 70 वर्षीय महिलेवर हल्ला केला. या हल्ल्यात पीडित महिलेचा मृत्यू झाला.  




महत्वाच्या बातम्या