Assebly Elections Result: गुजरात (Gujarat Election Result)आणि हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh Result) विधानसभा निवडणुकांचे निकालांचा कल दुपारी 3 वाजेपर्यंत स्पष्ट झाला आहे. गुजरातमध्ये भाजपचे ऐतिहासिक रेकोर्डब्रेक विजय (BJP Historic Won in Gujarat) संपादन केला आहे. तर, दुसरीकडे हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने (Congress In Himachal Pradesh) भाजपला धक्का दिला आहे. हिमाचलमध्ये काँग्रेसची बहुमताकडे वाटचाल सुरू आहे. तर, बुधवारी दिल्ली महापालिका निवडणुकांमध्ये 'आप'ला (Aam Aadami Party) बहुमत मिळाले. पण, गुजरातमधील निवडणुकीत मिळालेल्या मतदानाच्या आधारे राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे म्हटले जात आहे. उत्तर प्रदेशातील लोकसभा पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाला यश मिळाले आहे. त्यामुळे सध्या तरी सर्वपक्षीय सेलिब्रेशन सुरू आहे. 


गुजरातमध्ये भाजपचे कमळ 


गुजरातमध्ये भाजपचा विजय होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. काँग्रेसनेही निवडणुकीत फारसा जोर लावला नसल्याची चर्चा होती. तर, आम आदमी पक्षाने प्रचाराची राळ उडवून वातावरण निर्मिती केली होती. मात्र, भाजपने रेकोर्डब्रेक विजय मिळवत सगळ्यांनाच धक्का दिला. काँग्रेसची दाणादाण उडाली असून आम आदमी पक्षाने लक्षणीय मते घेत 5 जागांवर आघाडी घेतली आहे. 


हिमाचलमध्ये विजयाचा काँग्रेसला 'हात'


हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने भाजपला धक्का दिला. भाजपला हिमाचल प्रदेशमधून पायउतार व्हावे लागणार असल्याचे चित्र आहे. हिमाचलमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत दिसून आली. काही मतदारसंघात दोन्ही पक्षांच्या उमेदवारांमध्ये 1000 अथवा त्यापेक्षा कमी मतांते अंतर दिसून येत आहे.  हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने बहुमताचा आकडा गाठला असल्याचे आता तिसऱ्या राज्यात काँग्रेसची सत्ता येणार असल्याचे चित्र आहे. हिमाचल प्रदेशच्या विजयामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.


'आप'ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा


गुजरातमध्ये आम आदमी पक्षाने लक्षणीय मते घेतली. गुजरातमध्ये आम आदमी पक्षाने सुमारे 13 टक्के मिळाली आहेत. या मतांमुळे आप पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 'आप'ची दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्ता असून गोवा विधानसभा निवडणुकीतही लक्षणीय मते घेतली होती. आता, गुजरातमध्येही 13 टक्के मते घेतलीत. त्याशिवाय, दिल्ली महापालिका निवडणुकीच्या निकालात 'आप'ने बाजी मारली. दिल्ली महापालिकेत मागील 15 वर्षांपासून भाजपची सत्ता होती. दिल्ली महापालिकेची मुदत संपल्यानंतर केंद्र सरकारने दिल्लीतील तीन महापालिकांचे विलीनीकरण करून एकच महापालिका स्थापन केली. त्यानंतर दिल्ली महापालिका निवडणुका पार पडल्यात. या निवडणुकीत 'आप'ने चांगली कामगिरी करत बहुमत मिळवले.  250 जागा असलेल्या दिल्ली महापालिका निवडणुकीत आपने 134 जागा आणि भाजपला 104 जागांवर विजय मिळवला. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: