नवी दिल्ली : सुशासन आणि विकासाच्या राजकारणाला जनतेचा पाठिंबा असल्याचं गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालातून समोर आलं आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही राज्यातील भाजप कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं आहे.
गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील जनतेचे मोदींनी आभारही मानले. विकासाचा हा प्रवास असाच सुरु राहिल. दोन्ही राज्यातील जनतेची अविरतपणे सेवा करु, असं आश्वासन मोदींनी दिलं. ट्वीट करुन मोदींनी जनतेचे आभार मानले.
अत्यंच चुरशीच्या बनलेल्या गुजरातमध्ये भाजपने बहुमतापेक्षाही जास्त जागांवर आघाडी घेतली आहे. तर सुरुवातीला मुसंडी मारलेल्या काँग्रेसची नंतरच्या फेरीमध्ये पिछेहाट झाली. पंतप्रधान मोदींसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली होती. तर काँग्रेसनेही संपूर्ण ताकद पणाला लावली होती.
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या सर्व 182 जागांचे कल हाती आले आहेत. काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर असताना, प्रत्येक पक्षासाठी एक-एक मत बहुमूल्य ठरत आहे.
नोटाचा पर्याय निवडला!
मात्र नोटाच्या आकड्यांवर नजर टाकली तर 1.8 टक्के म्हणजेच सुमारे सव्वा पाच लाख मतदारांनी कोणत्याही उमेदवाराला मत दिलं नाही. 5,24,709 मतदारांनी भाजप किंवा काँग्रेस उमेदवारांना मत न देता NOTA चं बटण दाबलं, जो एक मोठा आकडा आहे.
गुजरात निकालानंतर किरीट सोमय्यांची उद्धव ठाकरेंवर टीका
कोणत्या पक्षाला किती टक्के मतदान?
दुसरीकडे भाजपला गुजरातमध्ये 48.9 टक्के मतं मिळाली आहेत. तर काँग्रेसला 42 टक्के नागरिकांचं समर्थन मिळालं आहे. 34,50,761 मतदारांनी भाजपला मत दिलं असून काँग्रेसच्या बाजूने 29,68,152 नागरिकांनी मतदान केलं. तर अपक्ष 4 टक्के, बसपा 0.7 टक्के, राष्ट्रवादीच्या 0.7 टक्के मतं मिळाली आहेत.
दुपारी दीड वाजेपर्यंत भाजप 104, काँग्रेस 75 आणि इतर 3 जागांवर आघाडी होते.
गुजरातचा निकाल, कोण - काय म्हणालं?
पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील भाजप-काँग्रेसच्या जागा
आज सकाळी आठ वाजता गुजरात निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. एकूण 182 जागांसाठी गुजरातमध्ये 9 आणि 14 डिसेंबरला मतदान पार पडलं. पहिल्या टप्प्यात 68 टक्के मतदान झालं होतं, तर दुसऱ्या टप्प्यात 68.70 टक्के मतदान झालं होतं.
पहिल्या टप्प्यातील 89 जागांपैकी 48 जागा मिळाल्या. तर काँग्रेस 41 जागांवर यश मिळालं. दुसऱ्या टप्प्यातील 93 जागांपैकी भाजपला तब्बल 61 जागा मिळवता आल्या. मात्र काँग्रेसला अवघ्या 30 जागाच मिळवल्या.