नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आला आहे. शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे जवळपास 20 पेक्षा जास्त आमदार नॉट रिचेबल आहेत. हे सर्व आमदार गुजरातमध्ये आहेत. विधानपरिषदेत शिवसेनेची फुटलेली मतं आणि एकनाथ शिंदे गट नॉट रिचेबल असल्यामुळे ठाकरे सरकार संकटात आहे. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. शरद पवार सध्या दिल्लीत आहेत. 

विधानपरिषद निवडणुकीदरम्यानच देशात राष्ट्रपती निवडणुकीची लगबग सुरु आहे. त्यासाठी विरोधकांची जुळवाजुळव आहे. त्यानिमित्तानेच शरद पवार कालपासून दिल्लीत आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी बघता शरद पवारांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केल्याची माहिती मिळते. शरद पवार आपल्या सर्व बैठकांचा सपाटा सकाळपासूनच सुरु करतात. मात्र आज त्यांनी आपल्या सर्व बैठका रद्द केल्या आहेत. 

पवारांच्या घराबाहेर शांतताशरद पवारांचा दिल्लीतील बंगला नेहमी रेलचेल असणारा भाग आहे. मात्र आज पवारांच्या घराबाहेर प्रचंड शांतता आहे. दुपारी विरोधी पक्षांची बैठक आहे. त्या बैठकीला शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊत उपस्थित राहणार आहेत. मात्र आता या बैठकीचं काय होणार हे पाहावं लागेल.

संजय राऊतांचा दिल्ली दौरा रद्द दरम्यान शिवसेनेतल्या घडामोडींचं गांभीर्य वाढल्याचे मोठे संकेत आहेत. कारण शिवसेना खासदार संजय राऊत यांचा दिल्ली दौरा अचानक रद्द झाला आहे. राष्ट्रपती निवडणुकीसाठी शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीसाठी आज संजय राऊत दिल्लीत हजर राहणार होते. पण एकनाथ शिंदे यांच्या नाराजी नाट्यामुळे संजय राऊत दिल्ली ऐवजी आता मुंबईतच थांबणार आहेत.

एकनाथ शिंदेंसोबत कोण कोण आमदार नॉट रिचेबल? एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे काही आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली. एकनाथ शिंदे 25 शिवसेना आमदारांसह रात्री उशिरा सूरतच्या मेरिडियन हॉटेलमध्ये पोहोचले आणि तिथं त्यांची भाजप नेत्यांशी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे यानंतर होणाऱ्या राजकीय घडामोडींकडे आता लक्ष लागलं आहे.

नॉट रिचेबल आमदार : 

साताऱ्याचे आमदार महेश शिंदेसांगोल्याचे आमदार शहाजी पाटीलउमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुलेपंराड्याचे आमदार तानाजी सावंतबुलढाण्याचे आमदार संजय रायमूलकरमेहकरचे आमदार संजय गायकवाडबाळापूरचे आमदार नितीन देशमुखांचा मोबाईल बंद आहेसिल्लोडचे आमदार आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तारपैठणचे आमदार आणि राज्यमंत्री संदिपान भुमरेऔरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाटकन्नडचे आमदार उदयसिंग राजपूतवैजापूरचे आमदार प्रा. रमेश बोरनारेभुदरगडचे आमदार प्रकाश आबिटकरमहाडचे भरत गोगावले