मुंबई: देशभरात मंगळवारी रात्री चंद्रदर्शन न झाल्यानं रमजान ईद आज साजरी केली जात आहे. चंद्रदर्शन झाल्यावरच ईद साजरी करण्याचा निर्णय शाही इमाम घेत असतात. त्यामुळे दिल्लीच्या जामा मशिदीच्या शाही इमामांनी यासंदर्भात घोषणा केली होती.

 

देशभरात ईदचा उत्साह आहे. दिल्लीतील जामा मशिद आणि मुंबईच्या मिनारा मशिदीला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानसह मुस्लिम राष्ट्राच्या प्रमुखांना फोनवरुन ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

मुंबईत कडक सुरक्षा

 

ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. सौदी अरेबियातील मदिना मशिदीजवळ झालेल्या आत्मघातकी स्फोटानंतर गुप्तचर यंत्रणांनी महाराष्ट्र पोलिसांना सतर्कतेचा इशारा दिला होता.

 

त्यामुळे आज ईदच्या दिवशी सर्व मशिदींच्या आवारात मिळून तब्बल 16 हजार पोलिसांचा बंदोबस्त आहे.