Vishwa Hindu Parishad on Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराला (Ayodhya Ram Mandir) आता कुलूप लावण्याची कोणाची ताकद नाही. राम मंदिराचा विरोध करणाऱ्यांना निवडणुकीत हिंदू मतदार (Hindu Voter) अद्दल घडवणार असल्याचे वक्तव्य विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांनी केले आहे. अनेक राज्यात ओबीसी आरक्षणात मुस्लिमांना घुसवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याची राष्ट्रीय पातळीवर चौकशी व्हावी अशी मागणी देखीलमिलिंद परांडेंनी केली आहे. देशातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेनं महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
ओबीसी आरक्षणात मुस्लिमांना घुसवण्याचे प्रयत्न
अनेक राज्यात ओबीसी आरक्षणात मुस्लिमांना घुसवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्याची राष्ट्रीय पातळीवर चौकशी व्हावी. एससी, एसटीमधून धर्म परिवर्तन करुन मुस्लिम झालेल्यांना आरक्षणाचा लाभ मुळीच नको असे विश्व हिंदू परिषदेनं म्हटलं आहे. महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावर विविध हिंदू जातींमध्ये भांडण लावली जात आहेत. असल्याचंही विश्व हिंदू परिषदेनं म्हटलं आहे.
एससी - एसटी - ओबीसींसाठी असलेल्या महामंडळांची चौकशी करा
राम मंदिराच्या जागी आता मशिद बांधून देण्याची कुणाची ही शक्ती नाही. जर तुम्ही निवडणुकीत रामाला शिव्या देणार असाल, तर त्याची फळं भोगावीच लागतील असेही परांडे म्हणाले. निवडणूक प्रचारात काँग्रेसने युसीसी तसेच धर्मांतरणविरोधी कायदे रद्द करण्याची भाषा केल्याचा आरोप करत अशा वक्तव्यावरही विश्व हिंदू परिषदेने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. अनेक राज्यात ओबीसी आरक्षणात मुस्लिमांना बळजबरीने घुसवण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत. राष्ट्रीय पातळीवर या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. तसेच एससी - एसटी - ओबीसी यांच्या कल्याणासाठी जी महामंडळ आहेत, त्यांची ही खोलवर चौकशी केली पाहिजे अशी मागणी परांडे यांनी केली.
महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावर हिंदू धर्मातील विविध जातींना समोरासमोर आणलं जातंय
एससी एसटीमधून अनेक लोक धर्मांतरण करून ख्रिश्चन किंवा मुस्लिम धर्म स्वीकारतात. अशा लोकांना आरक्षणाचा लाभ मिळायला नको अशी मागणीही विहीपने केली आहे.. महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावर हिंदू धर्मातील विविध जातींना समोरासमोर आणलं जात आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर हिंदू हिंदूशी भांडेल असे प्रयत्न जाणीवपूर्वक केले जात आहेत. मात्र हिंदू धर्मियांनी आपापसात सलोखा ठेवावा अशी अपेक्षा विश्व हिंदू परिषदेने व्यक्त केली आहे. देशात सीएए कायदा लागू होणार असून या कायद्यान्वये भारताचे नागरिकत्व मिळवण्यासाठी लोकांना सर्वतोपरी मदत करू, त्यासाठी देशात आणि महाराष्ट्रात कॅम्प सुरू करू अशी माहिती ही परांडे यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या: