Road Safety Campaign : ट्रक चालकांसाठी सरकार लवकरच कायदा आणणार असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिल्लीतील एका कार्यक्रमा दरम्यान बोलताना सांगितलं. तसचे, रस्ते अपघात 2025 च्या अखेरपर्यंत 50 टक्क्यांनी कमी करण्याचं मंत्रालयाचं उद्दिष्ट असून त्यासाठी प्रयत्नही सुरू असल्याचं गडकरींनी सांगितलं.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं की, लवकरच ट्रक चालकांच्या कामाचे तास निश्चित करण्यासाठी कायदा आणला जाईल. तसेच, 2025 च्या अखेरपर्यंत रस्ते अपघात 50 टक्क्यांनी कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचंही यावेळी नितीन गडकरींनी सांगितलं.
रस्ता सुरक्षा सप्ताहादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या सार्वजनिक मोहिमेमध्ये नितीन गडकरी सहभागी झाले होते. यावेळी ते म्हणाले की, "रस्ते मंत्रालय, रस्ते अपघात कमी करण्यासाठी मंत्रालय कटिबद्ध आहे आणि रस्ते सुरक्षेत कोणतेही 4ई - अभियांत्रिकी, अंमलबजावणी (Enforcement), शिक्षण (Education) आणि आपत्कालीन काळजी (Emergency) या क्षेत्रात अनेक पावलं उचलली गेली आहेत."
ट्रक चालकांसाठी कायदा आणणार
बुधवारी प्रसिद्ध झालेल्या सरकारी निवेदनानुसार, मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, "ट्रक चालकांसाठी कामाचे तास निश्चित करण्यासाठी कायदा आणला जाईल. या वर्षी मंत्रालयाने 'सर्वांसाठी सुरक्षित रस्ते' या उपक्रमाचा प्रचार करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी स्वच्छता पंधरवड्यातंर्गत 11 ते 17 जानेवारी दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह (RSWM) साजरा केला.
जनजागृती मोहिमेवर विशेष भर
आठवडाभरात मंत्रालयाने 'नुक्कड नाटक' (स्ट्रीट शो), संवेदनशीलता मोहीम, शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा, कॉर्पोरेट्सच्या सहकार्याने रस्ता सुरक्षा प्रदर्शन, वॉकथॉन्स, टॉक शो आणि दिल्लीतील विविध ठिकाणी पॅनल चर्चा यासह अनेक उपक्रमांचं आयोजन केलं होतं.
याव्यतिरिक्त, NHAI, NHIDCL, इत्यादी सारख्या रस्त्यांची मालकी असलेल्या एजन्सी, वाहतूक नियम आणि नियमांचं पालन, पादचाऱ्यांची सुरक्षा, टोल प्लाझावर चालकांसाठी नेत्र तपासणी शिबिरं आणि रस्ता अभियांत्रिकीशी संबंधित इतर उपक्रमांशी संबंधित विशेष मोहीम हाती घेतात. तसेच, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे वाहतूक आणि पोलीस विभाग, स्वयंसेवी संस्था, खाजगी कंपन्या आणि देशभरातील सर्वसामान्य जनतेने रस्ता सुरक्षेशी संबंधित उपक्रमांबाबत जनजागृती मोहीम राबवून जनजागृती करण्याची गरज असल्याचंही नितीन गडकरींनी बोलताना सांगितलं आहे.
हेही वाचा
Road Accident: एक डुलकी अन् जीवाशी खेळ! सर्वाधिक रस्ते अपघात 'या' वेळेतच होतात- काय आहेत कारणं