जप्त केलेल्या नऊ कारची किंमत 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. यासोबतच ईडीने नीरव मोदीचे म्युच्युअल फंड आणि शेअर्सही गोठवले आहेत. ज्याची किंमत सध्या 7 कोटी 80 लाख रुपये सांगितली जात आहे.
याचप्रमाणे या घोटाळ्यातील दुसरा आरोपी आणि नीरव मोदीचा मामा मेहुल चोक्सीच्या संपत्तीवरही ईडीची कारवाई सुरु आहे. ईडीने मेहुल चोक्सीचे 72 कोटी 80 लाख रुपयांचे शेअर्स गोठवले आहेत.
मामा भाच्याच्या या जोडीने पीएनबीत साडे अकरा हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. बँकेने प्रकरण सार्वजनिक केल्यामुळे एक रुपयाही कर्ज परत करणार नाही, असं उत्तर नीरव मोदीने बँकेला पत्र लिहून दिलं होतं.
आतापर्यंत कुणाकुणाला अटक?
या प्रकरणी अद्याप 12 जणांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारीही सीबीआयने नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या कंपनीच्या पाच कर्मचाऱ्यांना अटक केली. यामध्ये नीरव मोदीच्या कंपनीचा सीएफओ विपुल अंबानीची अटक सर्वात मोठी कारवाई आहे.
वकिलाकडून नीरव मोदीचा बचाव
पंजाब नॅशनल बँकेच्या साडे अकरा हजार कोटींच्या घोटाळ्यानंतर डायमंड किंग नीरव मोदी भारतातून पसार झाला आहे. मात्र नीरव मोदी पळाला नसून कामानिमित्त अगोदरपासूनच देशाबाहेर असल्याचा दावा त्याच्या वकिलाने केला. नीरव मोदीची केस लढण्यासाठी दुबईहून भारतात आलेले वकील विजय अग्रवाल यांनी या घोटाळ्यातील प्रश्नांची उत्तरं दिली.
PNB घोटाळा : विपुल अंबानीसह 5 जणांना सीबीआयची अटक
नीरव मोदी कोणत्या देशात आहे, या प्रश्नाचं उत्तर वकिलांनी दिलं नाही. मात्र हा घोटाळ्या जेवढा सांगितला जात आहे, तेवढा नाही, असाही दावा वकिलाने केला. नीरव मोदी निर्दोष असल्याचाही दावा वकिलाने केला.
नीरव मोदी प्रकरणात पुढे काहीही होणार नाही : वकील
नीरव मोदी तपास यंत्रणांसमोर हजर होणार नाहीत, असंही वकिलाने स्पष्ट केलं. तपास यंत्रणा सध्या नीरव मोदींच्या कर्मचाऱ्यांना त्रास देत आहेत, असा आरोप वकिलाने केला. याअगोदरही अनेक घोटाळे समोर आले आहेत, मात्र कोर्टात आरोप सिद्ध झालेले नाहीत. नीरव मोदी प्रकरणातही हेच होणार आहे, असा दावा वकिलाने केला.