ED Raid : लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांचे निकटवर्तीय (RJD) आरजेडी नेते सुभाष यादव (Subhash yadav) यांना ईडीने अटक केली आहे. तब्बल 14 तास सुभाष यादव यांच्या मालकीच्या 8 ठिकाणी ईडीने छापे टाकले होते. मिळालेल्या माहितीनुसार, दानापूर येथील राहत्या घरातून दोन कोटी रुपयांच्या रोख रकमेशिवाय प्रचंड संपत्तीची कागदपत्रे सापडली आहेत.
8 ठिकाणी ईडीचे छापे
सुभाष यादव यांनी 2019 ची लोकसभा निवडणूकही आरजेडीच्या तिकिटावर लढवली होती. त्याच्यावर पाटण्यात अवैध वाळू उत्खनन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. आयकर विभागानेही त्याच्या जागेवर छापे टाकले आहेत. लालू प्रसाद यादव यांचे निकटवर्तीय आरजेडी नेते सुभाष यादव यांना ईडीने अटक केली आहे. सुभाष यादवच्या 8 ठिकाणी ईडीने 14 तास छापे टाकले होते. मिळालेल्या माहितीनुसार, दानापूर येथील राहत्या घरातून दोन कोटी रुपयांच्या रोख रकमेशिवाय संपत्तीची कागदपत्रे सापडली आहेत.
ईडी कडून कसून चौकशी
मिळालेल्या माहितीनुसार, सुभाष यादव याचा अवैध वाळू व्यवसायाशीही संबंध आहे. याआधी शनिवारी ईडीने सुभाष यादव यांच्या घरावर छापा टाकला होता. लालू यादव यांचा निकटवर्तीय सुभाष यादव यांच्याबाबत ईडी कडून कसून चौकशी करण्यात येत आहे. शनिवारी ईडीकडून त्यांच्या निवासस्थानासह अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले. सुभाष यादव हे आरजेडीचे नेते असून त्यांनी झारखंडमधून त्यांनी निवडणूकही लढवली आहे.
वाळू व्यवसायाशी संबंधित ईडीची कारवाई
ईडीने दानापूरसह 6 ठिकाणी छापे टाकले होते. मिळालेल्या माहितीनुसार, राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे निकटवर्तीय सुभाष यादव यांच्या निवासस्थानावर छापा टाकण्यासाठी ईडीचे पथक शनिवारी पोहोचले. वाळू व्यवसायाशी संबंधित एका प्रकरणात सुभाष यादव यांच्यावर ईडी ही कारवाई करत आहे.
हेही वाचा>>>