कच्छ: गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात आज भूकंपाचे झटके बसले आहेत. या भूकंपाची तीव्रता 3.1 रिश्टर स्केलची असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. संबंधित अधिकाऱ्याने या संदर्भात माहिती दिली आहे. या भूकंपानंतर कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचं कळतंय. गांधीनगरमध्ये दुपारी 12 वाजून 57 मिनिटाला भुकंपाचे झटके बसल्याचं भूकंप संशोधन संस्थेच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. याचे केंद्र भचाऊपासून 14 किलोमीटर उत्तर-पश्चिममध्ये होते. 2001 मध्ये कच्छ जिल्ह्यात विनाशकारी भूकंप आला होता. ज्यात हजारोंच्या संख्येने लोकांचे जीव गेले होते. लाखोंच्यावर घर उध्वस्त झाले होते. भूकंप आल्यास काय करावे? -जर तुम्ही एखाद्या इमारतीमध्ये आहात तर जमीनीवर बसा आणि मजबूत फर्निचरखाली जाऊन बसावे. -भूकंपाच्यावेळी इमारतीबाहेर असाल तर झाड, खांब, आणि विजेच्या तारेपासून लांब रहा. -गाडीत असाल तर तातडीने गाडी थांबवा आणि गाडीतच बसून रहा. -आपल्या घरात नेहमी आपत्कालीन कीट ठेवा.