Earthquake in Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमधील काश्मीर खोरे आणि जम्मूतील संभागमध्ये शनिवारी भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. भूंकपाचे झटके जाणवताच लोकांनी घराबाहेर धाव घेतली. हे धक्के काही सेकंद जाणवले. मात्र, या दरम्यान घर, जमीन हलत होती. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. परंतु, कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे. 


अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे केंद्र?


अफगाणिस्तान-ताजिकिस्तान सीमावर्ती भागात शनिवारी सकाळी ९.४५ वाजता ५.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. तर पाकिस्तानच्या इस्लामाबादच्या पश्चिमेला शनिवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. परिणामी जम्मू-काश्मीर आणि दिल्ली एनसीआरच्या काही भागातही भूकंपाचे धक्के बसले. 


 






भूकंप आल्यास काय करावे आणि काय करू नये?


भूकंपाचे धक्के जाणवल्यावर अजिबात घाबरू नका. सर्वप्रथम तुम्ही एखाद्या इमारतीत असाल तर इमारती बाहेर या आणि मोकळ्या मैदानावर, जागेवर उभे राहा. इमारतीतून उतरताना लिफ्टचा वापर टाळावा. भूकंपाच्या वेळी लिफ्टचा वापर करणे धोकादायक ठरू शकते. त्याच वेळी, इमारतीतून खाली उतरणे शक्य नसल्यास, जवळ असलेल्या टेबलखाली किंवा पलंगाखाली लपून राहा.


 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha