Bride workout Pre Wedding Shoot : सध्या लग्नाआधी प्री- वेडिंग फोटोशूट (Pre Wedding Shoot) करण्याचा ट्रेंड सुरू आहे. वर- वधू त्यांच्या विवाह सोहळ्या आधी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन फोटोशूट करतात. प्री-वेडींग फोटोशूटमध्ये वेगवेगळ्या रोमँटिक पोजमध्ये फोटो अनेक जण काढतात. पण नुकतच एका नववधूने हटके प्रीवेडिंग शूट केले आहे. तिच्या या फोटोशूटचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.  


वर्कआऊट करतानाचे नव वधूचे हटके प्री-वेडींग फोटोशूट
नववधूच्या प्री-वेडींग फोटोशूटचा व्हिडीओ आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी त्यांच्या ट्वीटर अकाउंटवर शेअर केला आहे.  व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिले, 'प्री-वेडींग शूट...'  व्हिडीओमध्ये  नववधू 25 किलोग्रामच्या डम्बल्सचा वापर करून ‘इंक्लाइन डम्बल प्रेस’ करताना दिसत आहे. तसेच अल्टर्नेट डम्बल कर्ल आणि पुली पुश डाउन हे वर्कआऊटचे प्रकार देखील तिने केले. ती वधू वर्कआऊट करताना एक फोटोग्राफर तिचे फोटो काढताना दिसत आहे. ओरेंज कलरची साडी, सोनेरी दागिने आणि केसांमध्ये गजरा असा लूक त्या नवरीने प्री-वेडींग शूटसाठी केला होता.






Actress Childhood Photo : 'या' क्यूट मुलीला ओळखलं? सध्या आहे बॉलिवूडची 'एंटरटेन्मेंट क्विन'


रुपिन शर्मा यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओला शेअर केल्यानंतर काही मिनीटांमध्येच हजारो कमेंट्स आणि लाइक्स मिळाले. आत्तापर्यंत या व्हिडीओला 17 हजारपेक्षा लोकांनी पाहिले आहे. एका यूझरने या व्हिडीओवर कमेंट केली, 'लग्न हे युद्धासारखे असते त्यामुळे जोरदार तयारी केली पाहिजे.'  


RRR सिनेमातील 'नाचो नाचो' गाणे झाले सुपरहिट, Alia Bhatt गाण्याचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली...


Kartikeya Wedding: अभिनेता कार्तिकेयने केले ग्रँड साऊथ इंडियन लग्न, आशीर्वाद देण्यासाठी पोहोचले चिरंजीवी