तपास पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे महसूल गुप्तचर संचलनालय आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागानं औद्योगिक वसाहतीमध्ये छापा टाकला. या छाप्यात तब्बल 3 हजार कोटींचे ड्रग्ज जप्त केले आहेत.
या ड्रग्स रॅकेटचा मास्टरमाईंड सुभाष दुधानी हा मूळचा राजस्थानचा आहे. पण त्याचं वास्तव्य सध्या मुंबईत आहे. बॉलिवूड सिनेमांचा निर्माता अशीही दुधानी याची ओळख आहे.
या अंमली पदार्थांच्या अतिसेवनाने माणूस कोमामध्ये जाऊ शकतो. आफ्रिका आणि आशिया खंडात या ड्रगला मोठी मागणी आहे. या अंमली पदार्थाला मॅन्ड्रेक्स, एम-पिल्स, बटन्स किंवा स्मार्टीज असंही नाव आहे. या ड्रगच्या एका छोट्या गोळीची किंमत आठ हजार रुपयांच्या घरात आहे. धूम्रपान करताना या ड्रगचा वापर केला जातो.