Gujarat Drugs Case : गुजरात एटीएसने (Gujarat ATS)  ड्रग्जच्या (Drugs) विरोधात  मोठी कारवाई केली आहे.  गुजरात एटीएस आणि डीआरआयने कोलकाता येथे केलेल्या कारावाईत तब्बल 200 कोटीचे ड्रग्ज जप्त केले आहे. स्क्रॅप बॉक्समध्ये  40 किलो ड्रग्ज दुबई येथून  भारतात आणले जात असल्याची माहिती समोर आली आहे.


मागील काही महिन्यापासून गुजरात एटीएसकडून अंमली पदार्थ विरोधी कारवाई सुरू आहे. याच कारवाईमध्ये काही महिन्यांपूर्वी केलेल्या कारवाईत अंमली पदार्थाचा साठा जप्त केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, दुबईवरून आणलेले हे ड्रग्ज गिअर बॉक्समध्ये लपवण्यात आले होते. गुजरात एटीएसला या प्रकरणाची माहिती मिळाली. गुजरात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 गिअर बॉक्समध्ये लपवण्यात आले होते. हे ड्रग्ज दुबईच्या जेबेल अली पोर्ट येथून शिपिंग कंटेनरमध्ये पाठवण्यात आले. हे ड्रग्ज (Drugs)  फेब्रुवारी महिन्यात कोलकात्यातील (Kolkata) बंदरगाह येथे पोहचले.


सेन्च्युरी कंटेनर फ्रेट स्टेशनमध्ये 'गिअर बॉक्स' च्या मोहिम राबवण्यात आले होते. अतिशय चलाखीने हे माफिया भारतात ड्रग्ज आणत असल्याची माहिती समोर आली आहे. 36 गिअर बॉक्सपैकी ड्रग्ज बॉक्स ओळख पटण्यासाठी 12 गिअर बॉक्सला पांढऱ्या रंगाची खूण करण्यात आली होते. पांढऱ्या रंगाचे हे 12 बॉक्स उघडल्यानंतर यातील 72  हिरोईन जप्त करण्यात आले.  पोलिस महानिरीक्षक भाटिया म्हणाले, अद्याप ही कारवाई पूर्ण झालेली नाही. इतर गिअर बॉक्स सध्या चेक करण्यात येत आहे.


पोलिस प्रमुखांनी सांगितले की, गुजरात एटीएसला मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आल. गुजरात पोलिस तटरक्षक बल, एनसीबी (NCB) , पंजाब (Punjab) , दिल्ली पोलिस (Delhi Police) आणि अन्य एजन्सीने राबवलेल्या  संयुक्त मोहीमेत हे यश मिळाले आहे.  गुजरात पोलिसांनी (Gujrat Police) ड्रग्ज माफियांविरोधातमोठ्या कारवाया केल्या आहेत.  या ड्रग्जच्या माध्यमातून आपल्या देशातील युवा पिढी खराब करण्याचा  डाव आहे.  ड्रग्ज माफिया अगोदर पंजाब नंतर दक्षिण भारतातून पाठवत होते. त्यानंतर आता गुजरात सीमेवरून ड्रग्ज पाठण्याचा प्रयत्न करत होते.


संबंधित बातम्या :


Mumbai Drugs Case: मुंबई पोलिसांची गुजरातमध्ये मोठी कारवाई, एक हजार कोटींचे 513 किलो ड्रग्ज जप्त


Drugs Case : गुजरातमध्ये सहा महिन्यात पाच हजार कोटींचे ड्रग्ज जप्त, भारत-पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सागरी सीमेवर गुजरात एटीएसची कारवाई