पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना अटक केली असून त्यांच्याकडून 1 कोटी 34 लाख रुपये जप्त करण्यात आले आहे. हा पैसा कोणाचा आहे आणि तो कुठे घेऊन जात होते, याची चौकशी सुरु आहे.
तामिळनाडूच्या मुख्य सचिवांच्या घरातून 30 लाखांची रोकड जप्त
तामिळनाडूत मागील अनेक दिवसांपासून आयकर विभागाची कारवाई सुरु आहे. आयकर विभागाने काल (बुधवार) तामिळनाडूचे मुख्य सचिव राममोहन राव यांच्या अण्णा नगरमधील घरावर छापा टाकला. या छाप्यातून 30 लाख रुपयांच्या नव्या नोटा आणि पाच किलो सोनं जप्त करण्यात आलं. शेखर रेड्डीकडून मिळालेल्या माहितीवरुन हा छापा टाकला होता.
तामिळनाडूच्या मुख्य सचिवांच्या घरावर आयकर विभागाचा छापा
पैसे बदलण्याच्या रॅकेटचा पर्दाफाश
काही दिवसांपूर्वी आयकर विभागाने पैसे बदलण्याच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. यावेळी 96 कोटींची रोकड आणि 177 किलो सोनं जप्त केलं होतं. या प्रकरणी आयकर विभागाने श्रीनिवास रेड्डी, शेखर रेड्डी आणि प्रेम यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. यानंतर शेखर रेड्डीला अटक करण्यात आली आहे.
आयएएस अधिकाऱ्याच्या घरावर छापा, रोकड आणि सोनं हस्तगत
दुसरीकडे आयकर विभागाने एका आयएएस अधिकाऱ्याच्या घरावर छापा टाकून दीड कोटींची रोकड आणि सहा किलो सोनं हस्तगत केलं. तामिळनाडू वेअर हौसिंगचे व्यवस्थापकीय संचालक टी के नागराजन यांच्या घरी हा छापा टाकला होता.
25 कोटींच्या नोटा बदलणाऱ्या व्यावसायिकाला अखेर मुंबईत बेड्या
25 कोटींच्या नोटा बदलणाऱ्या पारसमल लोढाला बेड्या
तब्बल 25 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बदलून देणाऱ्या एका व्यावसायिकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पारसमल लोढा असं या व्यावसायिकाचं नाव असून तो मूळ कोलकात्याचा आहे. ईडीने लोढासाठी लूकआऊट नोटीस बजावली होती.
लोढानेच कर्नाटकातले उद्योगपती शेखर रेड्डी यांचे 120 कोटी, दिल्लीतला वकिल रोहित टंडन याचे 25 कोटी बदलून दिले होते. लोढा परदेशात पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी मुंबई विमानतळावर कारवाई केली. रेड्डीना काल सीबीआयने अटक केली होती.