Draupadi Murmu Oath Ceremony : देशाच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) या विजयी झाल्या आहेत. त्यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत यशवंत सिन्हा यांचा पराभव केला आहे. दरम्यान, द्रौपदी मुर्मू या उद्या (25 जुलै) पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत. द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती होणाऱ्या त्या पहिल्या आदिवासी महिला ठरल्या आहेत. त्यांच्या निवडीनंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. उद्या त्यांचा शपथविधी होणार असून, तो कार्यक्रम नेमका कसा असेल यासंदर्भाती माहिती पाहुयात...
द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मोठ्या फरकाने विजयी झाल्या आहेत. या विजयानंतर त्यांचे सर्वच स्तरातून स्वागत केलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या घरी जाऊन त्यांचे अभिनंदन केलं. तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. उद्या त्या राष्ट्रपती पदाची शपथ घेणार आहेत.
असा असेल शपथविधी सोहळ्याचा कार्यक्रम
- सकाळी 9 वाजून 25 मिनीटांनी द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती भवनात पोहोचतील
- राष्ट्रपती भवनात पोहोचल्यानंतर नवनियुक्त राष्ट्रपतींना गार्ड ऑफ ऑनर देण्यात येईल
- सकाळी 9 वाजून 50 मिनीटांनी द्रौपदी मुर्मू आणि रामनाथ कोविंद राष्ट्रपती भवनातून संसद भवनाकडे ताफ्यात एकत्र रवाना होतील.
- 10 वाजून 3 मिनीटांनी हा ताफा संसदेच्या गेट क्रमांक 5 येथील संसद भवनात पोहोचेल.
- त्यानंतर राष्ट्रपती, पंतप्रधान आणि इतरांसह सेंट्रल हॉलकडे रवाना होतील.
- 10 वाजून 10 मिनीटांनी सेंट्रल हॉलमध्ये आगमन आणि राष्ट्रगीत वाजवले जाईल
- 10 वाजून 15 मिनीटांनी शपथविधी सोहळा
- 10 वाजून 20 नवीन राष्ट्रपतींचे भाषण
- 10 वाजून 45 मिनीटांनी नव्या राष्ट्रपती आणि माळते राष्ट्रपती संसदेतून राष्ट्रपती भवनाकडे जातील
- 10 वाजून 50 मिनीटांनी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात समारंभ
- 11 वाजता राष्ट्रपती भवनात मावळत्या राष्ट्रपतींना निरोप दिला जाईल
महत्त्वाच्या बातम्या:
- Droupadi Murmu : द्रौपदी मुर्मू यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव, राज्यातील नेत्यांनी दिल्या शुभेच्छा
- Presidential Election : एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांचा विजय, राष्ट्रपतीपदावर पहिली आदिवासी महिला विराजमान