मेरठ : मेडिकल कॉलेजातून नुकतंच पास आऊट झालेल्या डॉक्टरांच्या धिंगाण्यामुळे रुग्णांना अतोनात त्रासाला तोंड द्यावं लागलं. सोशल मीडियात ही क्लीप व्हायरल झाली आहे. मेरठच्या लाला लजपतराय मेडिकल कॉलेजमध्ये हा प्रकार घडला. याप्ररकरणी कॉलेजच्या प्राचार्यांनी विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
या डॉक्टरांनी दारुच्या बाटल्या आणण्यासाठी चक्क रुग्णवाहिकेचाच वापर केला. शिवाय रशियन नर्तिका बोलावून मोठ्या आवाजात डान्स पार्टीही आयोजित केली. यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातलगांना मोठ्या त्रासाला तोंड द्यावं लागलं. याबाबत तक्रारही केली गेली. मात्र त्याला कुणीही दाद दिली नाही.
महाविद्यालय व्यवस्थापनाला याबाबत उशिरा माहिती मिळाली, असं सांगण्यात आलं आहे. मात्र कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्ह्याधिकाऱ्यांना फटकारलं आहे.
योगी आदित्यनाथ यांनी घटनेची सविस्तर माहिती घेतली असून प्राचार्यांची भूमिका काय होती, याची चौकशी करण्याचेही आदेश दिले आहेत. चौकशीनंतर काही प्राध्यापकांचं निलंबन होण्याचीही शक्यता आहे.
अॅम्बुलन्समधून दारु, रशियन डान्सर, रुग्णालयात डॉक्टरांचा धिंगाणा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Dec 2017 03:34 PM (IST)
मेरठच्या लाला लजपतराय मेडिकल कॉलेजमध्ये हा प्रकार घडला. याप्ररकरणी कॉलेजच्या प्राचार्यांनी विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -