डॉक्टरांनी पुकारलेला 12 तासांचा संप मागे
एबीपी माझा वेब टीम | 02 Jan 2018 03:29 PM (IST)
खाजगी रुग्णालयातील बंद असलेल्या सेवा त्वरित सुरु करण्याचं आवाहन आयएमएकडून सर्व खाजगी रुग्णालयांना करण्यात आलं.
प्रातिनिधिक फोटो
मुंबई : देशभरातील डॉक्टरांनी पुकारलेला संप मागे घेण्यात आला आहे. सकाळपासून बंद असलेल्या खाजगी रुग्णालयांतील सेवा तात्काळ सुरु करण्याचं आवाहन आयएमएने केलं आहे. मेडिकल काऊंसिल ऑफ इंडिया बरखास्त करुन त्याजागी नॅशनल मेडिकल कमिशन आणण्यासंबंधी विधेयकावर लोकसभेत चर्चा होण्याची शक्यता आहे. याचाच निषेध करण्यासाठी आज देशातील डॉक्टर संघटनांनी बारा तासांचा बंद पुकारला होता.