NMC Advise to Students : नॅशनल मेडिकल कमिशनने (NMC) युक्रेनमधून भारतात परतणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना पाकिस्तानमधील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश न घेण्याचा सल्ला दिला आहे. विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) आणि ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) यांनी काही दिवसांपूर्वी संयुक्त सल्लामसलत करून भारतीय विद्यार्थ्यांना पाकिस्तानमधील कोणत्याही महाविद्यालयात किंवा शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेन नये, असे आवाहन केले होते. त्यानंतर नॅशनल मेडिकल कमिशनने याबाबत सार्वजनिक नोटीस जारी केली आहे.
यूजीसी आणि एआयसीटीईशी सल्लामसलत करून असे सांगण्यात आले की, विद्यार्थ्यांनी पाकिस्तानमधील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला तर त्यांना भारतात नोकरी मिळणार नाही. शिवाय हे विद्यार्थी भारतात उच्च शिक्षण घेण्यास पात्र ठरणार नाहीत. 29 एप्रिल रोजी जारी करण्यात आलेल्या नोटीसमध्ये 'संबंधितांना वैद्यकीय शिक्षणासाठी पाकिस्तानला न जाण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
"भारताच्या कोणत्याही विद्यार्थ्याने पाकिस्तानमधील कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस/बीडीएस किंवा समकक्ष वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला तर तो भारतात नोकरी मिळविण्यास पात्र असणार नाही," असे नोटीसमध्ये म्हटले आहे.
पाकिस्तानमध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना भारतात नोकसाठी पात्र मानले जाणार नाही. मात्र, पाकिस्तानातून भारतात येणारे निर्वासित आणि त्यांच्या भारतीय नागरिकत्व मिळालेल्या मुलांना या निर्बंधातून सूट देण्यात येणार आहे. पाकिस्तानातून भारतात येणारे निर्वासित आणि भारतीय नागरिकत्व असलेल्या त्यांच्या मुलांना भारतात रोजगाराची संधी दिली जाईल, असे यूजीसीने 23 एप्रिल रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या