Power Crisis : राजधानी दिल्लीसह देशातील अनेक राज्यांमध्ये कोळशाच्या टंचाईमुळे विजेचे मोठे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे दिल्ली सरकारने केंद्र सरकारला पत्र लिहून पुरेसा कोळसा पुरवठा करण्याची विनंती केली आहे. 'सध्या 6.6 दशलक्ष टन कोळशाचा साठा आहे. यापैकी दोन लाख टन कोळसा रोज वितरित केला जातो. ज्यामुळे शिल्लक साठा हा आणखी 30 दिवस टिकेल, अशी माहिती सीसीएलचे अध्यक्ष पीएम प्रसाद यांनी सांगितली.
सध्या देशातील अनेक भागात विजेचं संकट निर्माण झाले आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने अनेक ठिकाणी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आवश्यक कोळशाचा पुरवठा करण्याची मागणी अनेक राज्यांनी केंद्राकडे केली आहे. यावर बोलताना पीएम प्रसाद म्हणाले, "सेंट्रल कोलफिल्ड्स लिमिटेडकडे 6 दशलक्ष टनांहून अधिक कोळशाचा साठा आहे. पंजाब, हरियाणा, यूपी, बिहार आणि झारखंडमधील वीज प्रकल्पांना दररोज 1.85 लाख टन कोळसा पाठवण्याचे लक्ष्य ठेवले आहे."
"मंत्रिमंडळ गट परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. आमच्याकडे उत्तरेला सात पॉवर प्लांट आहेत, ज्यात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि बिहारमधील एनटीपीसी प्लांट, झारखंडमधील तेनुघाट यांचा समावेश आहे. एप्रिल महिन्यात सरासरी 1.85 लाख टन कोळसा पाठवण्यात आला आहे. तर गेल्या सहा दिवसांत ही संख्या दोन लाखांवर पोहोचली आहे. याबरोबरच मे महिन्यात हे प्रमाण 2.20 लाख टनांपर्यंत वाढू शकते, असे पीएम प्रसाद यांनी सांगितले.
कोल इंडिया दररोज सुमारे 17.5 लाख टन कोळसा काढत आहे. गेल्या 15 ते 20 दिवसांत आम्ही दररोज दोन रेक पुरवत आहोत. आमच्याकडे एक महिन्याचा साठा असून पुढील एक आठवडा किंवा 10 दिवसांत त्यात सुधारणा होईल. या एप्रिलमध्ये कोल इंडियामध्ये सुमारे 25 टक्के उत्पादन वाढले आहे, अशी माही पीएम प्रसाद यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या