चेन्नई : तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे अध्यक्ष एम करुणानिधी यांना चेन्नईतील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 92 वर्षी करुणानिधी मागील काही दिवसांपासून आजारी आहेत.
करुणानिधी यांना आज (गुरुवार) सकाळी 5 वाजून 50 मिनिटांनी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डिहायड्रेशन आणि खाण्यास अडचणी होत असल्याने रुग्णालयात हलवण्यात आलं.
करुणानिधी यांच्यासोबत पत्नी राजाथिम्मल, मुलगा एमके स्टॅलिन आणि माजी केंद्रीय मंत्री दयानिधी मारनही रुग्णालयात होते.
रुग्णालयाने परिपत्रक काढून सांगितलं की करुणानिधी यांची प्रकृती स्थिकर असून डॉक्टरांचं एक पथक त्यांच्यावर उपचार करत आहे. पुढील काही दिवस ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली रुग्णालयातच राहतील.