Coronavirus Cases Today in India : भारतात 188 दिवसांतील सर्वात कमी रुग्णांची नोंद झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत एक हजारांवर आहे. देशात 1334 नवीन कोरोना विषाणूच्या रुग्णांची नोंद झाली आहे. या नवीन कोरोना रुग्णांमुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4 कोटी 46 लाख 44 हजार 76 झाली आहे, तर देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 23 हजार 193 वर घसरली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी नवीन आकडेवारी जारी करत ही माहिती दिली आहे. 


कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट


देशातील कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट झाली आहे. कालच्या तुलनेत देशात 660 रुग्णांची संख्या कमी झाली आहे. आज देशात 1334 रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासांत 16 रुग्णांचा मृत्यू झाला होता. काल देशात 1994 नवे कोरोना रुग्णांची नोंद आणि चार रुग्णांचा मृत्यू झालाय. भारतात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 23 हजार 432 वरून 23 हजार 193 वर घसरली आहे. देशातील कोरोना रुग्णांचा सकारात्मकता दर  0.05 टक्के आणि पॉझिटिव्हीटी रेट 1.52 टक्क्यांवर आहे. तसेच देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.76 टक्के आहे.






गेल्या 24 तासांत कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे 42 हजार 864 डोस देण्यात आले आहेत. राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण 219.56 कोटी लसीचे डोस देण्यात आले आहेत. यामध्ये 95 कोटी लोकांना दुसरा डोस आणि 22.03 कोटी बूस्टर डोस देण्यात आले. सध्या देशात 23 हजार 193 रुग्ण कोरोना उपचाराधीन आहेत. गेल्या 24 तासात 1 हजार 557 रुग्ण कोरोना संसर्गातून मुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 87 हजार 905 कोविड चाचण्या करण्यात आल्या. देशात कोरोना महामारी सुरु झाल्यास आतापर्यंत एकूण 90.01 कोटी कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.